देवाडा आरोग्य केंद्राची दुर्दशा–-

HomeNewsनागपुर डिवीजन

देवाडा आरोग्य केंद्राची दुर्दशा–-

आसिफ सय्यद यांची तातडीने नवीन इमारतीची मागणी”–

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा येथील जीर्ण अवस्थेत असलेली इमारत व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी असलेली जीर्ण इमारत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या अशा अनेक मुद्द्यावर चर्चा करून निवेदन देण्यात आले. तालुक्यातील देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेली इमारत व कर्मचाऱ्यांचे सरकारी निवास स्थान अतिशय जीर्ण अवस्थेत असून ते कधी पण कोसळून रुग्णांचे व कर्मचार्‍यांचे जीव घेऊ शकते.

त्यामुळे आपण लवकरात लवकर नवीन इमारत साठी पाठपुरावा करावा. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, याठिकाणी पाऊस आल्यानंतर पूर्ण पाणी इमारती मध्ये जाते त्यासोबत याठिकाणी अनेकदा विषारी साप सुद्धा इमारती मध्ये गेल्यामुळे रूग्णां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या आरोग्य केंद्रात तीन डॉक्टर आहेत त्यापैकी एक डॉक्टर तात्पुरत्या नेमणुकी वर दुर्गापूर ला जाऊन असल्याने इकडे रूग्णांना सुद्धा फटका बसत आहे. याठिकाणी ओपिडी अनम ची एक पोस्ट रिक्त आहे.

तसेच दोन सिस्टर भुरकुंडा आणि मानोली नाहीत. देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 उपकेंद्र आहेत त्यापैकी 3 उपकेंद्रात (भुरकुंडा, सोनापूर, मानोली) आरोग्य सेवकांची पदे रिक्त आहेत. वरील सर्व रिक्त पदे भरण्यात याव्यात व त्या पैकी नियुक्त झालेल्या कर्मचार्‍यांचे पदग्रहण लवकरात लवकर करावे. अशा समस्त गंभीर मुद्द्यांवर आपण लवकरात लवकर दखल घेऊन राजुरा तालुक्यात असलेल्या या क्षेत्रातील जनतेला दिलासा द्याल अशी मागणी संबंधित अधिकार्‍यांना करण्यात आली. संबंधित अधिकार्‍यांनी येणार्‍या 10 दिवसात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्याचे, जीर्ण इमारती साठी लवकरात लवकर पाठपुरावा तसेच इतर सर्व मुद्द्यांवर तातडीने दखल घेतली जाईल असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,  तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रणय धोटे तालुका महासचिव साहिल शेख तथा अयान शेख उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page