गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) – दिनांक २० आक्टोंबर २०२४ रोज रविवारला स्थळ- रविभवन, नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भवितव्य काय असेल ? या विषयावर चिंतनशील कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ कार्यकर्ते आयु. हर्षवर्धन जाधव, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला खालील रिपब्लिकन उपस्थित होते.
सदर बैठकीत बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टीला प्रतिष्ठा मिळवून देणे बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते यांचे आद्य कर्तव्य आहे. म्हणून उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने बहुतेक उपस्थित कार्यकर्त्यांनी आपपले मत मांडून साधकबाधक चर्चा घडवून आणून खालील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
*ठराव क्रमांक १ :-
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कंस विरहित एकच असली पाहिजे.*
*ठराव क्रमांक २ :-
*चिंतन बैठकीत उपस्थित असलेले सर्व सहभागी कंसविरहित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होण्यास तयार आहेत.*
*ठराव क्रमांक ३ :-
*कंस विरहित असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्यत्व पक्षाध्यक्ष यांच्याकडून दिले नाही तर सदस्यत्वासाठी जनआंदोलन उभे केल्या जाईल.
*ठराव क्रमांक ४ :-
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा लोकप्रतिनिधी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उभा करून निवडणूक लढविली जाईल.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आयु. संजय मनवर उमरेड यांनी केले.
हर्षवर्धन जाधव, मुंबई, संजय मनवर उमरेड, दिपाली चहांदे, सरीता सातारडे, उज्वला गणवीर, बाळू घरडे, चंद्रकांत गमरे रत्नागिरी, मेघराज काटकर चंद्रपूर, राजू नगराळे, सरोज मेश्राम, शिरीष धंदरे, अमरनाथ भांगे, डॉ. निर्मल सरदार अमरावती, देवानंद लांजेवार अमरावती, अशोककुमार उमरे गडचांदूर, दिनकर कांबळे कोल्हापूर, बाबासाहेब वडगावकर मुंबई, के. जी. सुर्वे मुंबई, रमेश जीवने यवतमाळ, दुर्वास चौधरी, विनायकराव जामगडे, सचिन गजभिये, एच. बी. जाधव
COMMENTS