चिचाळ येथे जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था च्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे करण्यात आले होते आयोजन
गौतम नगरी चौफेर (भंडारा) – पवनी तालुक्यातील चिचाळ येथे आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 ला दुपारी 1वाजता जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था मर्यादित चिचाळ रजिस्टर नंबर 431 च्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. सर्वप्रथम सर्वप्रथम आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले , जिजाऊ , व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करण्यात आले.त्यानंतर स्वागत गीत घेण्यात आले. व संपूर्ण पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संस्थेच्या वतीने या वार्षिक आमसभेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ मनीषा राजेश नंदपुरे, संस्थापक राजेश नंदपुरे स्वीकृत संचालक, उपसरपंच जगतराम गभने स्वीकृत सदस्य, चुनीलाल लांजेवार स्वीकृत संचालक,ज्येष्ठ मार्गदर्शक जयरामजी दिघोरे व संपूर्ण संस्थेच्या सभासदांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, व डॉ. ए.पी.जे. कलाम नावाड्याचं पोर ते राष्ट्रपती एक रोमहर्षक कहानी हे पुस्तक भेट देऊन पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे दहावी व बारावी मध्ये प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सौ लक्ष्मी डोकरे, सौ वर्षा जिभकाटे ,सौ सुनंदा नंदपुरे ,सौ मंजुषा गभने ,सौ धनश्री लोहकर ,सौ अलका शास्त्रकार ,सौ पूजा रामटेके ,सौ रेखा शेंदरे ,सौ प्रीती काटेकाये, सौ चंदा शास्त्रकार व जिजाऊ महिला सहकारी पतसंस्थेच्या सर्व महिला भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहकार्य केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ मनीषा राजेश नंदपुरे यांनी केले. तर अहवाल वाचन व्यवस्थापक आकाश घटारे यांनी केले .कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी लेंडे व आभार मुकेश रामटेके यांनी मानले. यावेळी सर्व सभासदांना चाय नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
COMMENTS