मोहर्ली वनपरिक्षेञातील जुनोना बफर मधील
वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांनी रानगव्याची केली शिकार
गौतम नगरी चौफेर //संतोष पटकोटवर चंद्रपूर : वाघिण व तिची तीन बछडे अशा वाघाच्या एकत्रित कुटूंबाने रानगव्याची शिकार केल्याचा थरारक अनुभव पर्यटकांनी घेतला व या शिकारीचा व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने समाज माध्यमात ही शिकार चांगलीच गाजली. मोहर्ली वनपरिक्षेत्रातील जुनोना बफर मधील हा व्हीडीओ असल्याची समाज माध्यमावर चर्चा असली तरी हा व्हीडीओ नेमका कुठला आहे याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र वाघाच्या कुटूंबाच्या एकत्रित शक्तीने रानगव्याची शिकार केल्याचे या व्हीडीओतून दिसत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जंगल असो की ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मध्य चांदा, राजुरा, पोंभूर्णा, बल्लारपूर लगतच्या जंगलात सर्वत्र वाघ दिसून येत आहे. जंगल भ्रमंतीसाठी आलेल्या एका जिप्सीतून युवकांनी हा व्हीडीओ घेतला आहे. या व्हीडीओत युवक आपसात मराठीत बोलत आहे. त्यामुळे हा व्हीडीओ एक तर मग चंद्रपूर जिल्ह्यातील किंवा विदर्भातील असावा सांगण्यात येत आहे. असे या व्हीडीओ मध्ये वाघिण व तिच्या तीन पिल्लांना जंगलात निलगाय भेटते. तीन पिल्ल सुरुवातीला रानगव्यासोबतच खेळतात. मात्र तिन्ही पिल्ल व वाघिण असे वाघाचे एकत्रित कुटूंब रानगवाला सुरूवातीला खेळवतात आणि अतिशय पध्दतशिरपणे तिची शिकार करतात असे या व्हीडीओत दिसते. हे विशेष 💥💥




COMMENTS