श्रीमती गोपिकाबाई सांगळा आश्रम शाळा राजुरा स्व. नामदेवराव जाधव प्राथ. आश्रमशाळा राजुरा येथे भगवान बिरसा मुंडा (150 वी जयंती) जनजाती गौरव दिन, विशेष नावीन्यपूर्ण उपक्रमाने उत्सहात  साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

श्रीमती गोपिकाबाई सांगळा आश्रम शाळा राजुरा स्व. नामदेवराव जाधव प्राथ. आश्रमशाळा राजुरा येथे भगवान बिरसा मुंडा (150 वी जयंती) जनजाती गौरव दिन, विशेष नावीन्यपूर्ण उपक्रमाने उत्सहात  साजरा

गौतम नगरी चौफेर //हिरापूर // गोपिकाबाई सांगळा आश्रम शाळा राजुरा स्व. नामदेवराव जाधव प्राथ. आश्रमशाळा राजुरा येथे भगवान बिरसा मुंडा (150 वी जयंती)जनजाती गौरव दिन,विशेष नावीन्यपूर्ण उपक्रमाने विविध शालेय विद्यार्थी व शिक्षक उपक्रम राबवून उत्सहात  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध नान्हा तर्हेच्या शालेय उपक्रमाने विविध शालेय स्पर्धा दिवसभर आयोजन करण्यात आले.दिवसभर, वारली पेंटिंग, चित्रकला, निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. गुणवंत विद्यार्थी, पालक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.                    

मान्यवारांनी जनजाती गौरव दिन व भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती व शालेय स्तरावर शिक्षण घेऊन पालक, शिक्षक समाजाला सुसंस्कृत, देशाला सशक्त, सक्षम नागरिक मिळेल ही अपेक्षा व्यक्त केली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अरुणजी मडावी जिल्हाध्यक्ष भाजपा अनु. जमाती मोर्चा हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोदजी कोडापे, कोषाध्यक्ष भाजपा कोरपना,युवा नेते हे हॊते, विशेष अतिथी म्हणून राजुराचे तहसीलदार गौडं साहेब,राजुरा भाजपा नेते सचिन डोहे,डॉ. कुळमेथे, मयुरी कोरवेते पोलीस विभाग, संस्थेच्या संचालिका लक्ष्मीताई जाधव, लखण जाधव, मुरलीधर गोहने,, जीवनदास कन्नाके, श्री. गरजलवार, श्री. तल्हारे,प्राचार्या मोहितकर मॅडम,पिसे साहेब,घोडमारे सर,श्री. हिरडे, श्री. दवडे छबीलाल सिडाम गट साधन केंद्र राजुरा टीम हे मन्यावर उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन निमगडे सर तर आभार प्राथ. मुख्यद्यापक खोब्रागडे यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page