नागपंचमीला साकोलीत “सर्पमित्रांचा” सत्कार फ्रिडम, व्हीआयपी व साकोली मिडीयाचे अभिनव आयोजन

HomeNewsनागपुर डिवीजन

नागपंचमीला साकोलीत “सर्पमित्रांचा” सत्कार फ्रिडम, व्हीआयपी व साकोली मिडीयाचे अभिनव आयोजन

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – साकोली शहरातील सर्पमित्र एकीकडे आपला जीव धोक्यात घालून जनतेची सुरक्षा करणारे आणि दूसरीकडे शेतकऱ्यांचा मित्र सापांना सुरक्षित पकडून वन्यक्षेत्रात सोडणारे “सर्पमित्र” यांचा नागपंचमीला ( मंगळ. २९ जुलै ) ला साकोलीत सत्कार करण्यात आला. हे अभिनव आयोजन शहरातील व्हीआयपी ग्रुप, फ्रिडम युथ फाऊंडेशन व साकोली मिडीयाने केले. याप्रसंगी वनविभागाचे कर्मचारी सुद्धा हजर होते.

या पावसाळ्यातील दिवसात सरपटणाऱ्या प्राण्यांपासून प्रत्येक घरी धोका असतो. एका फोनवर सर्पमित्र धावून येत जनतेची सुरक्षा करतात. व विषारी, बिनविषारी सापांना पकडून वन्यक्षेत्रात सोडणारे सर्पमित्रांचा सत्कार शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आला. ही संकल्पना फ्रिडमचे किशोर बावणे यांनी साकारली. त्यातच साकोली सेंदूरवाफा येथील सर्पमित्र युवराज बोबडे, सुरेंद्र राऊत, रितीक बडोले, विक्की नेवारे, निकेश सय्याम, निशांत अथिलकर, प्रणित मंडारे यांचा व्हीआयपी ग्रुपचे अध्यक्ष अनिल कापगते, फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे, साकोली मिडीया संचालक आशिष चेडगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. प्रसंगी साकोली वनपरिक्षेत्र कर्मचारी एस. जी. खंडागळे, एस. जी. जाधव, विश्वनाथ बघेले, पत्रकार मनिषा काशिवार, गणेश बोरकर, डॉ. रतन मौजे, मुकेश पंचभाई, कार्तिक लांजेवार, हेमंत चांदेकर, प्रितम मेश्राम, आर्यन कोवे, पवन खरकाटे, मयुर आंबेडारे हे उपस्थित होते. यावेळी वनविभागाच्या कर्मचारी यांनी सांगितले की, सर्पमित्रांना विभागातर्फे सुरक्षा साहित्य देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. ते आपला जीव धोक्यात घालून जनतेची सुरक्षा करतात. तर पत्रकार मनिषा काशिवार म्हणाले की, व्हीआयपी, साकोली मिडीया व फ्रिडमने आज नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्रांना सत्कार करून शहरात एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

आपला जीव धोक्यात घालून जनतेची सुरक्षा करणारे सर्पमित्रांना शासनाकडून काहीच मोबदला मिळत नाही. करीता जनतेने त्यांना प्रवास खर्च व इतर देण्यासाठी आवाहन सुद्धा आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमात संचालक शिक्षक हरिशचंद्र सोनवाने यांनी केले तर आभार मनिषा काशिवार यांनी मानले. विशेष म्हणजे सर्पमित्रांचा सत्कार हा प्रथमच व अभिनव उपक्रमातील आयोजन करण्यात आल्याने सर्व सर्पमित्र याप्रसंगी भारावून गेले होते. कारण याआधी कुणीच सर्पमित्रांचा शहरात सत्कार केलेला नव्हता हे विशेष

COMMENTS

You cannot copy content of this page