अखेर पिंपळगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात;

HomeNewsनागपुर डिवीजन

अखेर पिंपळगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात;

आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामवासियांनी घेतला सुटकेचा श्वास.
ग्रामवासियांनी मानले आमदारांचे आभार.

गौतम नगरी चौफेर कोरपना :- गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांच्या विळख्यात अडकलेल्या आणि ग्रामस्थांच्या संतापाचा विषय ठरलेल्या पिंपळगाव रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. वारंवार होणारे अपघात आणि धुळीच्या साम्राज्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी आता सुटकेचा श्वास सोडला असून, या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार देवराव भोंगळे यांचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी आभार मानण्यात येत आहेत.

नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आमदार देवरावदादा भोंगळे यांनी तातडीने या विषयात लक्ष घातले. त्यांनी ०५ जुलै २०२५ रोजी जिल्हा वार्षिक योजना ५०५४ अंतर्गत १५० लक्ष रुपयांच्या निधीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळून १० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत ३०५४–३५२२ या लेखाशिर्षांतर्गत ७० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

यापूर्वी एका वर्षा आधी ऐन निवडणुकीचा तोंडावर काँग्रेसचा काही पदाधिकाऱ्यांनी २५ लक्ष रुपये रस्त्याचे भूमिपूजन केले होते. रस्त्यासाठी निधी आम्हीच मंजूर केला असा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न देखील त्यांनी केला होता. मात्र तो निधी मजूर झाला न्हवता आता तो देखील निधी मंजूर झाला असून एकूण ९५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाल्याने रस्ता आता गुळगुळीत बनणार आहे.

पिंपळगाव येथील रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती की, सामान्य नागरिकांना चालणेही कठीण झाले होते. किरकोळ अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष होता. काही दिवसांपूर्वी पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये या संदर्भात एक वादळी ग्रामसभा पार पडली होती. “रस्ता नाही, तर मतदान नाही” अशी भूमिका घेत संपूर्ण गावाने आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला होता. या पवित्र्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. हे विशेष

आम्ही वेळोवेळी रस्त्या संदर्भात आमदार महोदयांची भेट घेऊन कानावर घातले होते त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केले रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने पिंपळगाववासीयांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहे. “खड्ड्यांमुळे आमचे जगणे कठीण झाले होते, पण आमदार महोदयांनी आमची मागणी गांभीर्याने घेतली :- आबाजी बोबडे उपसरपंच पिंपळगाव

COMMENTS

You cannot copy content of this page