पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
गौतम नगरी चौफेर //संतोष पटकोटवार गडचांदुर येथे पांच देशी व सात विदेशी दारू विक्रीचे चिल्लर दुकानें आहेत,सकाळी दहा वाजेपासून ते रात्री 10वाजे पर्यंत दुकाने सूरु ठेवणयाचा शासनाचा आदेश आहे परंतु। बारा बारा तास दारू दुकानें सुरु असतांना गडचांदुर येथे ठिकठिकाणी रात्री पाळी मध्ये अवैध रीतीने दारू विक्री सूरू असलयाने परीसरातील नागरीकांचे संपूर्ण आयुष्य धोकयात आले आहे,दिवस रात्र दारु पिऊन लीवर,कीडणी डॅमेज होऊन अनेकांचे आयुष्य धोकयात आले आहे,मधयपिंचे आपल्या मुलांबाळाकडे , आपल्या संसाराकडे परीपूर्ण दुर्लक्ष होत असलयाने दारिद–याला सामोरे जावे लागत आहे , दिवसेंदिवस रात्री पाळीमध्ये अवैध रीतीने दारू विकणा-याची हिम्मत चांगलीच वाढती वर आहे,या कड़े पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे,या दारू विक्रेतयांचे मूसकया आवळून रात्री पाळीमधये अवैध रीतीने विक्री करणा–या दारू विक्रेतयावर कायम स्वरूपीं बंदी घालावी अशी येथील नागरीकांची मागणी असून या गंभीर समस्येकड़े ठाणेदाराने जातीने लक्ष देणयाची गरज आहे अशी प्रतीक्रीया नागरीकांनी गौतम नगरी चौफेर ला व्यक्त केली आहे
COMMENTS