संयुक्त रिपब्लिकन आघाडी तर्फे जिल्हाधिकारी मार्फत केंद्रीय निवडणूक आयोग यांना निवेदन
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आज दिनांक 16 ऑक्टोबर 2024 ला संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ राज्य जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्यामार्फत केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकार यांना 23 नोव्हेंबर हा दिवस शहीद गोवारी स्मृतिदिन असल्याने निवडणूक निकाल घोषित करण्याची तारीख 23 नोव्हेंबर ऐवजी 22 नोव्हेंबर किंवा 24 नोव्हेंबर घोषित करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले .याबाबत सविस्तर वृत्त असे की ,महाराष्ट्र राज्याची निवडणूक तारीख घोषित झाली असून मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 ला आहे. परंतु नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गोवारी समाजाने आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता त्या मोर्चाप्रसंगी गोवारी समाजाचे 114 गोवारी बांधव झालेल्या चेंगराचेंगरीत शहीद झाले होते. व 500 जखमी झाले.दरवर्षी हजारो गोवारी बांधव नागपूर येथे आपल्या शहीद बांधवांना अभिवादन करीत असतात. ह्या वर्षी सुद्धा 23 नोव्हेंबरला निवडून आलेले उमेदवार गुलाल उधळून व फटाके फोडून आनंद व्यक्त करीत असतील तर दुसरीकडे नागपूरच्या मध्यवर्ती भागी गोवारी बांधव आपल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतील. त्यामुळे गोवारी बांधवांच्या भावनेला ठेच पोहोचेल. त्यांच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे गोवारी समाजाच्या भावनांचा विचार करून भारत निवडणूक आयोगाने मतमोजणीची 23 नोव्हेंबर ची तारीख निश्चित केली. त्या तारखेमध्ये 22 नोव्हेंबर किंवा 24 नोव्हेंबर करावी अशी आपणाला विनंती करण्यात येत आहे. निवेदन देताना चंद्रशेखर टेंभुर्णे संयोजक संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ राज्य जिल्हा भंडारा, सुरेश मोटघरे प्रदेश सचिव बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, ऑल इंडिया आदिवासी भंडारा श्रीराम बोरकर तालुकाप्रमुख समता सैनिक दल ,दिलीप वानखेडे सामाजिक कार्यकर्ते, संजीव भांबोरे राष्ट्रीय अध्यक्षअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटना ,मधुकर ऋशेस्वरी, राष्ट्रपाल नाईक सामाजिक कार्यकर्ते ,राजेश मडामे सामाजिक कार्यकर्ते ,सुरज डोंगरे शहराध्यक्ष भीम आर्मी भंडारा , प्रबोधनकार ग्यानचंद जांभुळकर प्रबोधनकार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
COMMENTS