चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स ची सभा संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स ची सभा संपन्न.

– विवीध विषयांवर कऱण्यात आली चर्चा.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा १९ जुलै
         चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने सन २०२५-२६ या सत्राकरिता राज्य पुरस्कार सुधारित प्रवेश अर्ज भरण्याबाबत व अभ्यासक्रमातील बदल, संभावित जिल्हा मेळावा आयोजन, स्काऊट गाईडच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीच्या दृष्टिकोनातून स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन यांना विषयाची उजळणी होणे आवश्यक आहे करिता तालुका निहाय स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन यांचे उजळणी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्याबाबत आदी विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड जिल्हा कार्यालय चंद्रपूर येथे आयोजीत सभेला लक्ष्मणराव धोबे, चंद्रकांत भगत, जिल्हा संघटक स्काउट्स, दिपा मडावी, जिल्हा संघटीका, गाईड्स, यशवंत हजारे, सेवानिवृत्त माजी जिल्हा संघटक, स्काउट्स, किशोर ऊईके, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त, बादल बेले, प्रशांत खुसपुरे, नागेश सुखदेवे, किशोर कानकाटे, प्रमोद बाबळीकर, अविनाश जुमडे, शुद्धोधन मेश्राम, सीमा वादिले,  विजयालक्ष्मी कुंडले, सीमा भसारकर, पुरुषोत्तम गायकवाड, रंजना किनाके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला स्काउट्स गाईड्स सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. सभेत अनेक विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. राजेश पाताळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर , अश्विनी सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर तथा जिल्हा आयुक्त चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS

You cannot copy content of this page