सिद्धार्थ लांजेवार यांच्यावर तलाठ्याने केलेल्या अन्यायाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण सुरू

HomeNewsनागपुर डिवीजन

सिद्धार्थ लांजेवार यांच्यावर तलाठ्याने केलेल्या अन्यायाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण सुरू

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – सिद्धार्थ देवराव लांजेवार यांच्या वडिलांनी  सन 1985 यावर्षी खैरी निवासी बाळकृष्ण व रतीराम कडव यांच्याकडून भूमापन क्रमांक ९०/1 क्षेत्र 1.12 हेक्टर आर शेतजमीन खरेदी करण्याचा करारनामा केला होता .पण सदर शेतमालकाने रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ केली. या विरोधात लांजेवार यांनी दिवाणी न्यायालय भंडारा येथे केस क्रमांक 95 /91 दाखल केली होती .त्याचप्रमाणे दिनांक 2 सप्टेंबर 1998 रोजी माननीय न्यायालयांनी लांजेवार यांच्या बाजूने निकाल दिला.त्या निकालाविरुद्ध बाळकृष्ण कडव व इतर हे अपील मध्ये गेले. त्यातही लांजेवार यांच्या बाजूने निर्णय लागला. तरीसुद्धा कडव यांनी मुद्दाम व हेतूपरस्पर लांजेवार यांना रजिस्टरी करून दिलेली नाही. परंतु त्या शेतजमिनीवर जोत, कब्जा, व वहीवट सन 1985 पासून लांजेवार यांचीच असून विविध प्रकारचे पीक, फसल घेत आहेत. दरम्यानच्या काळात बाळकृष्ण कडव व रतीराम कडव यांचा मृत्यू झाला. आणि त्यांच्या वारसानांनी फेरफार घेऊन सातबारा वर नोंद करून घेतली. तरीही लांजेवार यांचा कब्जा, जोत, वहीवट कायम असल्याने सदर शेतजमिनीची कडव यांनी रजिस्ट्री करून न देता दि. 19/10/2022 ला सौं. प्रीती मनीष नखाते रा. कामठी जि. नागपूर या महिलेश रजिस्ट्री करून दिली. तसेच लांजेवार यांनी लावलेली धानाची फसल काही नातेवाईकांच्या मदतीने सदर महिलेनी बळजबरीने हार्वेस्टर मशीनने लांजेवार यांच्या गैरहजेरीत चोरून नेली. सदर भुमापन क्र. 90/1 क्षेत्र 1.12 या शेतजमिनीवर सन 1985 पासून लांजेवार यांचा जोत, कब्जा, वहीवट आणि शेतात उभे पीक असतांनी सुद्धा तलाठी कोथुर्णा /खैरी येथील श्री सीमेश हेमराज हुमणे यांनी मा. न्यायाधीश, भंडारा कोर्ट यांना दि. 11/08/2023 ला खोटा अहवाल सादर केला. असा खोटा अहवाल सादर केल्याने लांजेवार यांनी दि. 29/09/2023 ला मा. तहसीलदार साहेब, भंडारा यांना फेर मौका चौकशी करण्यात यावी असा विनंती अर्ज लांजेवार यांनी केलेला होता. त्या अनुषंगाने दि. 04/10/2023 ला मा. मंडळ अधिकारी श्री. ठाकरे साहेब यांनी मौका तपासणी करून मा. तहसीलदार साहेब भंडारा यांना तपासणी अहवाल सादर केला की, मौजा –खैरी येथील भूमापन क्र. 90/1 क्षेत्र 1.12 हे. आर. या शेतजमिनीवर सिद्धार्थ देवराव लांजेवार यांचीच जोत कब्जा, वहीवट असून धानाचे पीक व तूर लावलेले आहे. त्यावेळी प्रत्येक्ष मौक्यावर श्री. ओमप्रकाश बाळकृष्ण कडव रा. खैरी हे हजर होते. परंतु कोथुर्णा /खैरी येथील तलाठी श्री. सीमेश हेमराज हुमणे त. सा. क्र. 19  यांनी कडव व नखाते यांच्या आमिष्याला व पैश्याचा लालचीने खोटा अहवाल कोर्टाला व शासनाला देऊन लांजेवार व शासनाची दिशाभूल केल्याने सदर तलाट्यावर सेवेतून निलंबणाची कार्यवाही करण्यासाठी  सिद्धार्थ देवराव लांजेवार रा. कोथुर्णा हे दि. 15/10/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा समोर आमरण उपोषनावर बसले आहेत. उपोषणकर्ता लांजेवार यांची प्रकृती खालावत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास याची सर्व जवाबदारी शासनावर राहील. तरीपण शासनाने सदर प्रकरणी योग्य दखल घेऊन  सिद्धार्थ देवराव लांजेवार यांना योग्य न्याय मिळवून द्यावा. व सदर प्रकरणी एक चौकशी समिती स्थापन करावी ही उपोषण कर्त्यांची ज्वलंत मागणी आहे.

COMMENTS