गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने २७ व २८ फेब्रुवारी २०२६ ला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ च्या१२ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. २७ फेब्रुवारीला रात्री १० ते २ वाजेपर्यंत भदंत विनयबोधी महाथेरो व भिक्खू संघ यांचे उपस्थितीत पवित्रण पाठाचे आयोजक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २८ फेब्रुवारीला भदंत विनयबोधी महाथेरो व भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत धम्मदेशना कार्यक्रमाचे दुपारी २ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ५ वाजेपर्यंत पाहुण्यांचे स्वागत समारंभ व मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या १२ व्या धम्म मेळाव्याचे उद्घाटन प्रकाश सोनवणे मुख्य संपादक ब्ल्यू स्टार्म न्यूज चॅनल पुणे करतील .तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाळकृष्ण सार्वे अध्यक्ष भंडारा जिल्हा पतसंस्था हे राहतील .विशेष अतिथी म्हणून चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद भंडारा, रोशन जांभुळकर अध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा, सदानंद ईलमे मुख्य संयोजक संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा, शिवशंकर मुंगाटे माजी उसभापती पंचायत समिती पवनी, बि.जी. दामले माजी सरकारी वकील, राजेश नंदापूरे संस्थापक सरस्वती स्कूल, संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, मिलिंद गोंडाने गुरुजी, जयश्री रोडगे माजी सरपंच, मनोज वैरागडे सामाजिक कार्यकर्ता, सदानंद धारगावे सामाजिक कार्यकर्ता यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शांतीवन बौद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध व शांतीवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित जीवनबोधि मेश्राम यांनी केलेले आहे.



COMMENTS