गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी चंद्रपूर) – जो धर्म केवळ जन्माच्या (जातीच्या) आधारे, माणसा-माणसांत भेद करतो, समानता नाकारतो तो धर्म,धर्म नसून माणसाला गुलाम बनवण्याचे षडयंत्र आहे. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक,येवले मुक्कामी असा धर्म त्यागण्याची ( धर्मांतर करण्याची )घोषणा केली, आणि 21 वर्षे या धर्म मार्तंडांना त्यात बदल करण्याची संधी दिली परंतु त्यांच्या मनुवादी,जातीवादी,वर्णवादी व्यवस्थेत ते बदल करायला तयार झाले नाहीत. आणि म्हणून सामाजिक समतेसाठी माणसाला मानवी मूल्य बहाल करण्यासाठी माणसाला गुलाम बनवणाऱ्या षडयंत्रकारी धर्म व्यवस्थेचा त्याग करून, जगाच्या इतिहासात रक्ताचा एक थेंबही न सांडता, विश्वरत्न, युगप्रवर्तक युगपुरुष बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरला (दीक्षाभूमी) 16 ऑक्टोबर 1956 रोजी केलेल्या “धम्मक्रांतीस” 68 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्याप्रसंगी पक्षाच्या जिल्हा कमिटी वतीने दीक्षाभूमी येथे संगीतमय बहारदार कार्यक्रम घेण्यात आला. त्या क्षणी भीमसैनिकांनी हजेरी लावून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कणखर नेतृत्व व आयोजक मा. गौतम तोडे (जिल्हाध्यक्ष) प्रमुख उपस्थिती मा पुष्पाताई मोरे, महिला आघाडी, जिल्हाध्यक्ष) मा विनोद वानखेडे (जिल्हा उपाध्यक्ष), मा.हंसराज वनकर (तालुकाध्यक्ष, चंद्रपूर), मा नागसेन डांगे (आयटीसेल, सोशल मीडिया, जिल्हाध्यक्ष), मा. प्रभाकर खाडे (तालुकाध्यक्ष कोरपणा), मा. गौतम धोटे, (तालुका महासचिव कोरपणा), मा. भिमराव मेंढे, (तालुका महासचिव चंद्रपूर) मा अमर वाकडे(ज्येष्ठ नेते) मा.शीला धोटे, (कोरपणा), मा.अश्विनी रायपुरे (चंद्रपूर), मा सीमा साखरे (विसापूर) व ईतर.
COMMENTS