शिर्डी येथे रविवारी महा – ई – सेवा आधार केन्द्र अधिवेशन

HomeNewsचंद्रपूर

शिर्डी येथे रविवारी महा – ई – सेवा आधार केन्द्र अधिवेशन

गौतम नगरी चौफेर ( विनोद एन खंडाळे) – महा ई सेवा आधार केंद्र चे पहिले अधिवेशन शिर्डी येथे रविवारी 8 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे..
     या राज्यस्तरीय अधिवेशनात महा ई सेवा केंद्र संचालक यांच्या अडचणी. काम करताना येणाऱ्या समस्या या बाबत चर्चा करून नवीन संघटना बांधणी बाबत विचार विनिमय होणारं आहे. जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्र संचालक यांनी या अधिवेशनात सहभागी व्हावे. असे आवाहन राज्य कार्यकारिणी आणि चंद्रपूर व्हिएलई सोसायटीचे जिल्हाअध्यक्ष यांनी केले आहे.राज्यशासनाने महसूल संबंधित विविध प्रकारच्या सुविधा जनतेला मिळाव्या या साठी आधार व सेतू केन्द्र सुरू केले आहेत.
    मात्र आधार केंद्र आणि सेतू सुविधा केंद्र संचालक यांच्या अनेक अडचणी आहेत.
त्या विषयी चर्चा करून सरकार कडे मागण्याचे निवेदन सादर करायचे आहे. म्हणून या अधिवेशनाला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्र संचालक यांनी या अधिवेशनात सहभागी व्हावे.
असे आव्हाहन चंद्रपूर व्हीएलई सोसायटीचे जिल्हा अध्यक्ष विनोद एन खंडाळे यांनी केले आहे……

COMMENTS