आदर्श हिंदी प्राथमिक विद्यामंदिर गडचांदूर येथे निवडणूक
गौतम नगरी चौफेर गडचांदूर :- सत्र 2025 26 साठी दोन जुलै रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली 10 जुलैला उमेदवारांचे फार्म घेण्यात आले 11 जुलैला उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. तब्बल वीस दिवसांचा कालावधी प्रचारासाठी देण्यात आला मुख्यमंत्री पदासाठी पाच उमेदवार उभे होते. एक ऑगस्टला मतदान घेण्यात आले 105 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन ऑगस्टला मतमोजणी पाच फेरी मध्ये घेण्यात आली. नयना रमेशचंद्र निषाद ला 36, कशिश किवटला 29, अबुजर शेख ला 23, चित्रलेखा निषादला 10, अनुज केवटला 6 तर 1मत चक्क नोटाला गेले. नैना निषाद सलग दुसऱ्या वर्षी निवडणुकीत निवडून आली. विशेष म्हणजे प्रत्येक सत्रात निवडणुकीद्वारे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मंजुषा मते व सर्व विद्यार्थ्यांनी नैनाचे अभिनंदन केले. निवडणूक प्रक्रिया पार करण्यासाठी विद्यालयातील सर्व अध्यापक अध्यापिकांनी सहकार्य केले.



COMMENTS