एकात्मिक शेती शाश्वत शेती –अजयकुमार राऊत प्रकल्प उपसंचालक आत्मा, भंडारा

HomeNewsनागपुर डिवीजन

एकात्मिक शेती शाश्वत शेती –अजयकुमार राऊत प्रकल्प उपसंचालक आत्मा, भंडारा

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), तालुका भंडारा अंतर्गत दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ ला मौजा माथाडी/पालगाव येथिल पाटीलवाडी कृषि पर्यटन तथा शेंडे कृषि फार्म येथे क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सर्वप्रथम कर्मवीर डॉ. पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला परिसरातील १०० ते १२० शेतकरी, प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कं.प्रतिनिधी तसेच उमेद अंतर्गत कृषि सखी उपस्थित होते.

एकात्मिक शेती शाश्वत शेती शेतीचे अर्थकारण आणि शेती करत असताना नोंदी यावर शेतकरी बांधवांनी कटाक्षाने लक्ष द्यावे. क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रमाला उपस्थित उप प्रकल्प संचालक आत्मा,भंडारा अजय राऊत यांनी शेतकरी बांधवाना शेती करीत असताना शेतकरी बांधवांनी उत्पादन आणि उत्पादनाला लागणार खर्च यांच्या नोंदी ठेवून ताळेबंद आणि त्यानुसार खर्च करावा असे प्रतिपादन केले.
दुसरं महत्त्वाचे म्हणजे मातृभूमीला जिवंत ठेवण्याकरिता जमिनीमध्ये सूक्ष्म जिवाणूंची वाढ होईल या उद्देशाने शेतकरी बांधवांनी शेतात कंपोस्ट खत,हिरवळीचे खत,वापर करावा आणि जमिनीचे भौतिक गुणधर्मात सुधारणा करून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.
शेतकरी बांधवानी मिशन अंतर्गत बांधावरील प्रयोगशाळा या घटकाचा लाभ घेऊन जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होईल.

सुधीरजी धकाते कृषि तज्ञ तथानिर्यातदारआंतरराष्ट्रीय बाजारपे यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना शेतकऱ्यांनी चांगल्या गणावत्तेचं आणि निर्यातक्षम भाजीपाला उत्पादित करून प्रतवारी,पकेजिंग आणि योग्य पद्धतीने ब्रँडिंग करून विक्री करावे जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत/ग्राहकापर्यंत गुणवत्ता पूर्ण भाजीपाला पोहचून शेतकरी बांधवाना योग्य दर कसे मिळेल यावर सखोल असे मार्गदर्शन केले.

शेतकरी मनोगत
मा.श्री.तानाजी गायधने कृषि भूषण सेंद्रिय शेती यांनी शेतकरी बांधवानी रासायनिक औषध, खत यांचा कमी वापर करून मातृभूमीला जिवंत, सजीव कसे ठेवता येईल आणि त्यासाठी आपल्या परिसरात आणि निसर्गात असलेल्या संसाधनांचा वापर करून शेती करून उत्पादनावरील खर्च कमी करावा असे मनोगत आणि मार्गदर्शन केले.

ठिंबक सिंचन आणि फर्टिगेशनचा वापर करून भाजीपाला शेती दादाभाई वाहणे (कृषी पदवीधारक)यांनी उपस्थितांना शेतीला व्यावसायिक दृष्टीने बघून शेती हा एक मोठा उद्योग असून ज्यांनी सूक्ष्म नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली नक्किच त्यांचा आणि परिवाराचा चरितार्थ साधेल असे मत व्यक्त केले.

श्री.बळीराम रोहनकर प्रगतिशील शेतकरी मौजा चोव्हा यांनी उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा वावर करून सेंद्रिय निविष्ठा तायर करून वापरावे आणि जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, विद्युत वाहकता आणि रासायनिक कीटकनाशकांचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर सखोल मारदर्शन केले.
प्रकाश गोपीचंद मस्के मु.डवा यांना महाराष्ट्र राज्य शासनच्या वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्या अनुषंगाने _आज किसान गोष्टी कार्यक्रमाप्रसंगी विभागाच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले*_ .
श्री.प्रकाश मस्के यांनी मार्गदर्शनपर भाषणामध्ये शेतकरी बांधवांनी शेतातील बारकावे लक्षात घेऊन शेती करावी आणि बाजाराभिमुख बाजारपेठेचा अंदाज लक्षात घेऊन त्यानुसार भाजीपाला लागवड करावी.मला मिळालेला कृषि भूषण हा माझा नसून  संपूर्ण विभागाचा आणि माझ्या शेतकरी बांधवांचा सन्मान आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाला उपस्थित किटक केव्हीके, साकोली डॉ. प्रशांत उंबरकर यांनी उपस्थितांना भात पिकावरील किड व रोग आणि शिफारशीत कीटकनाशके आणि वापराचे प्रमाण यावर सविस्तर मार्गदर्शन करून विविध जैविक, रासायनिक आणि एकात्मिक उपाय योजना सांगितल्या.
पशुसंवर्धन केव्हीके, साकोली

डॉ. प्रविण खिरारी यांनी उपस्थिताना पशुसंवर्धन मुरघास, चारा आणि त्यावर प्रक्रिया आणि  लसीकरण यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी,भंडारा श्री.अशोकराव जिभकाटे यांनी केले तर कार्यर्माचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सतिश वैरागडे यांनी केले.
सदर किसान गोष्टी कार्यक्रमाला गणेश शेंडे कृषि पर्यवेक्षक, पहेला,योगेश वासनिक कृषि पर्यवेक्षक पहेला,तंत्र सहायक नैसर्गिक शेती अभियान आणि सर्व कृषि सहाय्यक, कृषि सेवक विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि कृषि मित्र सुरेश शेंडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

COMMENTS