गुरू-शिष्याच्या नात्याला गालबोट, आरोपीला फाशीची मागणी.
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी नांदाफाटा) – ( दि. ०७ कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असलेल्या शिक्षक अमोल लोडे या नराधमाने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ काल (दि. ०६) भारतीय जनता पार्टी शाखा नांदाच्या वतीने आक्रोश रॅली काढून निषेध नोंदविण्यात आले.
गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासण्याचं काम करणाऱ्या अमोल लोडे नावाच्या कॉंग्रेसी नराधमाने मुली समान चिमुकल्या विद्यार्थींनीवर मागील अनेक महिन्यांपासून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केले. एवढेच नाही तर अजून काही मुलीचे लैंगिक शोषण केल्याची माहिती हळूहळू समोर येत आहे. विकृत मानसिकतेच्या अशा नराधमाला पाठीशी घालण्याकरिता व त्याला या प्रकरणातून वाचाविण्याकरिता कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केले. परंतू पिडीतेच्या आईने धैर्याने पुढे येऊन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कोणताही काँगेस नेता आला तरी मी घाबरणार नाही. अशी भुमिका घेतल्याने या प्रकरणाला वाच्यता आली. त्या मातेस आपण सलाम केले पाहिजे. सद्या आदिशक्ती माता दुर्गेची नवरात्र सुरू आहे, समाजातील अशी दुषित प्रवृती ठेचून काढण्यासाठी रणरागीणी बनून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक महिलांनी समोर आले पाहिजे. असे आवाहन निषेध रॅलीत बोलतांना विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी यावेळी केले.
या निषेध रॅलीत जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, महामंत्री प्रमोद कोडापे, उपसरपंच पुरूषोत्तम आस्वले, प्रमोद पायघन, पुरूषोत्तम भोंगळे, गडचांदूरचे शहराध्यक्ष अरविंद डोहे, शशिकांत आडकीने, अशोक झाडे, निखिल भोंगळे, संगीता आत्राम, रंजना मडावी, नमिता बिश्वास, गीता बोद्रे, संगीता मुसळे, संगिता चटकी, मीराबाई कामटकर, संजय नित आदिंसह भाजप पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
COMMENTS