आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल माणिकगड च्या विद्यार्थ्यांकडून नवरात्री मध्ये भाव भक्तीने सरस्वती पूजन.

HomeNewsनागपुर डिवीजन

आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल माणिकगड च्या विद्यार्थ्यांकडून नवरात्री मध्ये भाव भक्तीने सरस्वती पूजन.

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी गडचांदूर) – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगडने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा माणिकगडचे युनिट हेड अतुल कन्सल व उपाध्यक्ष मुकेश गहलोत यांच्या मार्गदर्शनात दुर्गा पूजेचे मोठ्या थाटात आयोजन केले
दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळावा व सर्व रहिवाशी सुख समृद्धीने जीवन जगावे या करीत दुर्गा माते समोर वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहेत त्यात नवरात्री दांडिया, आरती स्पर्धा, नाटक प्रतियोगिता, मोठ्या स्तरावर्ती पूजा व खास आकर्षक ठरलेले म्हणजे सरस्वती पूजा जी कि आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल मधील १० वि व १२ वि च्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.
या पूजनामध्ये १० वि व १२ वि तील एकूण ६० च्या जवळपास विध्यार्थी सहभागी झालेत व त्या सर्व विध्यार्थ्यानी पूर्ण मनोभावातून सरस्वती माता तसेच दुर्गा माता चे पूजन केलेत. यावेळी सर्व विध्यार्थ्यांना नोटबुक, पेन व प्रसाद वितरित करण्यात आलात, या दरम्यान आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल चे अध्यापक राजेश यादव, मानंदा खेडकर, दीपमाला सिंग व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी बाबू राजन तसेच पुजारी वर्ग सुद्धा उपस्थित होते.
अध्यापक राजेश यादव यांनी बोलताना सांगितले कि या नवरात्री मध्ये  प्राचार्य अर्चना गोलछा व माणिकगड प्रशासन यांच्या मार्गदर्शनात १० वि व १२ वि च्या विद्यार्थ्यांकडून शक्तीची देवता दुर्गा माता व विध्ये ची देवता सरस्वती मातेचे पूजन करून  येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत विध्यार्थ्यांना भरभरून यश मिळावे हा आहेत .

COMMENTS