सुजाता कन्या विद्यालय अड्याळ येथे 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

सुजाता कन्या विद्यालय अड्याळ येथे 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा

(प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.लालचंद रामटेके यांची उपस्थिती)

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालय येथे ( ता.6 ) ला विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. भारती गिरडकर ह्या होत्या.प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय येथील व्याख्याता डॉ.लालचंद रामटेके हे होते.प्रमुख अतिथी म्हणून सुजाता कन्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी.आर.हुमणे, युवाक्रांती फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य ) चे संस्थापक/अध्यक्ष,पत्रकार जयेंद्र चव्हाण,सुजाता कन्या विद्यालय येथील सहाय्यक शिक्षिका कु.एल.एम शेंडे आदी मान्यवरांची प्रमुख्याने उपस्थिती होती.

सर्वप्रथम शालेय परिसरात असलेल्या तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.उपस्थित मान्यवर,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,शालेय विद्यार्थिनी यांनी सामूहिक बुद्ध वंदना म्हणून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना डॉ.लालचंद रामटेके म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अष्ठपैलू व्यक्तिमत्व होते.बाबासाहेबांनी आपल्या संघर्षमय जीवनात कधीही हार मानली नाही.जिद्द आणि चिकाटीने प्रत्येक क्षेत्रात यश मिळविले.आपण सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श व्यक्तिमत्व समोर ठेऊन आपले भविष्य उज्वल करावे.प्रमुख अतिथी श्री.हुमणे सर,पत्रकार जयेंद्र चव्हाण,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा कु.गिरडकर मॅडम यांनी सुद्धा डॉ.आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.ह्याप्रसंगी इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनींनी डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भाषणे आणि गिते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन आणि आभार कु.अंशू विणकणे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विद्यालयातील शिक्षक आर.एस.नागपुरे,के.एफ.पचारे, एन. एम. गायधने,शिक्षिका कु.यु.बी.धुरंधर,इतर शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS