महाबोधी महाविहार मुक्त करा व दीक्षाभूमी सौंदर्यकरण तात्काळ सुरू करा

HomeNewsनागपुर डिवीजन

महाबोधी महाविहार मुक्त करा व दीक्षाभूमी सौंदर्यकरण तात्काळ सुरू करा

१ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू

पत्रकार संजीव भांबोरे यांनी संविधान चौक येथे पूज्य भदंत डॉ. चंद्रकीर्ती व अरुण गाडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली विविध विषयावर चर्चा

गौतम नगरी चौफेर //संजीव भांबोरे नागपूर आज दिनांक 1 जुलै 2025 ला दुपारी २ वाजता-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी संविधान चौकात सुरू असलेल्या धान्य आंदोलनाला भेट देऊन भदंत धम्म कीर्ती व अरुण गाडे यांच्याशी प्रत्यक्ष धरणे आंदोलन ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे व तो बौद्धांच्या हातात सोपविण्यात यावे त्याचप्रमाणे नागपूर येथील दीक्षाभूमी चे तात्काळ सौंदर्यकरण करण्यात यावे या प्रमुख मागणी करिता 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.. बिहार सरकारचे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरता या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,तथागत बुद्धाचा धम्म भारताच्या पावन भूमीतून जगातील सर्व देशात प्रसारित झाला. प्रियदर्शी सम्राट अशोकांनी 84000 हजार चैत्य व तुपाची निर्मिती केली होती. परंतु आपल्या भारत देशातील मनुवादी लोकांनी साम, दाम ,दंड ,भेद याचा वापर करून बुद्ध धम्म नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. भारतामध्ये अनेक हिंदू मठ ,मंदिरे तसेच बुद्ध विहार आहेत. तसेच बुद्ध गया परिसरात आमचे जागतिक कीर्तीचे महाबोधी महाविहार आहे त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धाला सम्यक ज्ञान प्राप्त झाले होते .भारतीय संविधान अमलात येण्याआधी बिहार सरकारकडून  बीटी ऍक्ट 1949 लागू करून इतर धर्मियांच्या ताब्यात दिले. परंतु बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात आलेले नाही . त्याकरिता महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या उद्देशाने आमचे शांतीप्रिय आंदोलन बुद्धगया बिहार राज्य येथे दिनांक 12 फेब्रुवारी सुरू असताना 27 फेब्रुवारीला मध्यरात्री मनुवादी लोकांनी बिहार  सरकार सोबत साटगाठ करून आमच्या मुख्य द्वारापासून हटविण्यात आले आणि तीन किलोमीटर दूर असलेल्या अंतरावर बसण्यासाठी मजबूर केले .त्यानंतर 13 मे 2025 ला मनुवादी लोकांनी आमचे पूज्य भिक्खू  यांच्यावर विविध धारा व खोटे संगेन आरोप लावून कारावासात जेहर बंद करण्यात आले. त्या निषेधार्थ व महाबोधी महाविहार बुद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे तसेच दीक्षाभूमी नागपूर येथील सौंदर्यकरण आणि बाजुलाच असलेली माता कचेरी व सी आर सी ची रिकामी जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला  देण्यात यावी या मागणी करिता बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे सदर धरणे आंदोलन एक जुलै 2025 पासून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 31 जुलै 2025 पर्यंत संविधान चौक नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे.  यावेळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भिक्षू तथा भिकुनी  संघ ,महिला सशक्तिकरण संघ ,ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम नागपूर स्थित सभी बौद्ध विहार समिती ,सामाजिक व राजकीय ,सांस्कृतिक संघटन त्याचप्रमाणे भंते डॉ चंद्रकीर्ती, अरुण गाडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट ट्राईब संघटना संघटना ,विजय मेश्राम भारतीय बौद्ध महा शाखा नागपूर जिल्हा सरचिटणीस,शंकरराव ठेंगरे, इंजिनियर पद्माकर गणवीर, प्रकाश दर्सनिक, जीआर गोडबोले, विजय मेश्राम, सरोज राजवर्धन ,विना नगराळे ,विनय ढोके, लक्ष्मीकांत मेश्राम ,गंगाधर कांबळे ,उषाताई बौद्ध ,निर्भय बागडे, बौद्ध उपासक उपाशी का मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page