कोरपना तालुक्यातील भारोसा येथील घटना
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी भोयगाव) कोरपना :- चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सर्वत्र पाऊस सुरु असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत त्यातच अनेक छोटे मोठे नाले तुडुंब भरले आहे यातच भोयगाव येथील एका इसमाचा नाल्यावरील पुलावरून रस्ता पार करीत असताना पाण्याचा अंदाज न कळल्याने पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची घटना भोयगाव येथे घडली
मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने सदर घटना आज दि ४ सप्टेंबर ला सकाळी उघडकीस आली. कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भारोसा येथील बाळू बारकू तोडासे वय वर्ष अंदाजे ५० असे मृतकाचे नाव असून बाळू हा भोयगाव येथे काल ताना पोळा पाहायला जातो म्हणून भोयगावं येथील ताना पोळा पाहतो आणी नातेवाईकाच्या घरी जातो असे घरच्यांना सांगून सायंकाळी अंदाजे ५ वाजता घरून निघून गेला. परंतु भोयगाव येथील ताना पोळा बघितल्यानंतर खूप वेळ झाल्यामुळे कुठेही न जाता त्यांनी गावाकडचा रस्ता धरला परंतु महामारगाणे न जाता गावातील रस्त्याने भारोश्याकडे जात असताना पांनघाटे, गोहने यांच्या शेताजवळ असलेल्या पुलावर पुराचे पाणी असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व त्यात त्यांचा बुडून जागीच मृत्यू झाला. सकाळी अंदाजे नऊ वाजता मृत्यू झाल्याची घटना कळताच भारोसा, भोयगाव येतील पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन गडचांदूर यांना कळवले असता गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गडचांदूर येतील पोलीसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठुन पंचनामा केला व मृतदेह शव विच्छेदनासाठी गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्या मृत्यू पच्यात एक पत्नी दोन मुले असा आप्त परिवार असून त्यांच्या मृत्यू मुळे शोककळा पसरली आहे व पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे
COMMENTS