अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड व आदित्य बिरला एजुकेशन ट्रस्ट द्वारा मासिक पाळीवर्ती मार्गदर्शन करण्यात आलेत

HomeNewsनागपुर डिवीजन

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड व आदित्य बिरला एजुकेशन ट्रस्ट द्वारा मासिक पाळीवर्ती मार्गदर्शन करण्यात आलेत

गौतम नगरी चौफेर (आवारपूर) – या आधुनिक युगात बदलत्या जीवनशैली मुळे मासिक पाळी च्या अनेक समस्या मुली तसेच महिला वर्गात वाढत चालल्या आहेत.
त्या साठी मुलींना योग्य वयात मासिक पाळीवर्ती योग्य मार्गदर्शनाची गरज असते हे लक्षात घेत अल्ट्राटेक माणिकगड च्या सी. एस. आर ने आदित्य बिरला एजुकेशन ट्रस्ट यांच्या उज्जास नावच्या उपक्रमा द्वारे मासिक पाळीवर्ती मार्गदर्शन आदर्श हिंदी स्कूल गडचांदूर येथे आयोजित केलेत. या मार्गदर्शनाला आदर्श हिंदी शाळेतील वर्ग 5 वी ते 10 विच्या एकूण 80 मुली तसेच महिला शिक्षक वर्ग उपस्थित होता. यात उज्जास उपक्रमातील प्रक्षिशीत महिला अधिकाऱ्यांनी मासिक पाळी तील समस्या वरती मार्गदर्शन केलेत, मुलींच्या समस्या एकूण त्याचे निराकरण केलेत तर सॅनिटरी पडचे महत्वाचं सुद्धा समजावून सांगितले. या उपक्रमाबद्दल बोलतानी शाळेतील मुख्याध्यापक मत्ते मॅडम यांनी उज्जास उपक्रमाची प्रशंसा करत या मार्गदर्शची सरहाना केलीत व सी.एस.आर. टीम ला या प्रकारचे महत्वाचे उपक्रम शाळेत वारंवार राबवावे असे सांगितले.

COMMENTS