जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न

३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

गौतम नगरी चौफेर (जिवती) – जिवती येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस बि. एल. ए. तथा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बि. एल. ए यांच्याशी संवाद साधून विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करण्याचे व काँग्रेसचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले. तर उपस्थितांनी आ. सुभाष धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी येल्लापूरचे माजी सरपंच
गणपत सोनकांबळे, मरकलमेटा चे माजी सरपंच तानियाबाई मडावी, मारई पाटण चे माजी सरपंच शेषराव सोनकांबळे यांनी आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन स्वागत करण्यात आले.     

यावेळी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे जेष्ठ नेते भीमराव मडावी, तालुकाध्यक्ष गणपत आडे, सुग्रीव गोतावळे, अमर रोठोड, ताजुदिन शेख, महादेव डोईफोडे, समीर पठाण, डॉ. अंकुश गोतावडे, नामदेव जुनाके, राम चव्हाण, नंदाताई मुसने, सिताराम मडावी, अश्फाक शेख, वामन पवार, शब्बीर भाई, नारायण वाघमारे, लहुजी गोतावळे, सुनील शेळके, दत्ता टोगरे, प्रशांत राठोड, रमेश जाधव, कोजी पा आत्राम, केशव राठोड, शामराव  गेडाम, दिवाकर वेट्टी, दीपक साबणे, मुनीर सय्यद, कराडे सर, दत्ता कांबळे, रणवीर भाऊ, अमोल कांबळे, यासह तालुका, शहर काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बि. एल. ए. आवर्जुन उपस्थित होते.

COMMENTS