विविध सामाजिक उपक्रमाने हंसराज अहीर यांचा वाढदिवस साजरा.

HomeNewsनागपुर डिवीजन

विविध सामाजिक उपक्रमाने हंसराज अहीर यांचा वाढदिवस साजरा.

– राजुरा व विहीरगाव येथे आरोग्य चिकित्सा व रोग निदान, उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप
– देवाडा येथे महाआरती, धोपटाळा, सास्ती, साखरी (वा.), रामपुर, चुनाळा गौशाळा येथे गरजुंना ब्लॅंकेट वाटप.

गौतम नगरी चौफेर सौ सुवर्णा बादल बेले राजुरा – १५ नोव्हेंबर  राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राजुरा तालुक्यात दि. 11 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. देवाडा येथे हनुमान मंदिरात महाआरती करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. माजी आमदार अॅड. संजय धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नगर परिषद येथील सफाई कामगारांची चिकित्सा व उपचार करण्यात आले. मोबाईल रूग्णवाहिकेच्या माध्यमातून विहीरगाव व राजुरा येथे रूग्णांची आरोग्य चिकित्सा व उपचार करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना फळ आणि ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

सास्ती, रामपुर येथे मजूर बांधवांना तसेच भारतीय मजदूर संघ कार्यालय, धोपटाळा येथे परिसरातील गरजुंना, चुनाळा गौशाळा येथे विद्यार्थ्यांना व साखरी येथे आदिवासी वस्तीमध्ये गरजुंना ब्लॅंकेंटचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने माजी आमदारद्वय अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, सतीश धोटे, श्री.अरुण म्हस्की, राजु घरोटे, अॅड. इंजी.प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, संजय पावडे, विनायक देशमुख, बाळनाथ वडस्कर, सौ. स्वरूपा झवर, मंजुषा अनमुलवार, लक्ष्मी बिस्वास, नैना परचाके, अल्का जुलमे, महादेव तपासे, लखन अडबाले, सचिन शेंडे, सचिन डोहे, शुभम मस्की, आकाश गंधारे, जनार्धन निकोडे, गणेश रेकलवार, कैलास कार्लेकर, संदीप गायकवाड, संदीप पारखी, रवी गायकवाड, नितीन भामरटकर, प्रदीप बोबडे, मंगेश श्रीराम, पराग दातारकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. राहुल सूर्यवंशी, श्रीनिवास कोपुला, राजकुमार निषाद, सुदर्शन बोबडे, चंद्रशेखर कावळे, मिथून काटवले, आनंदराव गोरे, आदींची उपस्थिती होती.

COMMENTS

You cannot copy content of this page