नांदा (फाटा) येथे सामुहिक रक्षाबंधन व महिला सन्मान मेळावा संपन्न.
गौतम नगरी चौफेर (नांदा फाटा):- बहिण-भावाच्या नात्यातील विश्वास वृद्धिंगत करणार्या या रक्षाबंधन कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वच भाजप कार्यकर्त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील मातृशक्तिपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा आज संकल्प करावा, असे आवाहन आयोजक तथा भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी केले.
नांदा (फाटा) येथील सांस्कृतिक सभागृहात भारतीय जनता महिला मोर्चा कोरपना तालुका व मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालय कोरपना च्या वतीने आयोजित केलेल्या सामुहिक रक्षाबंधन व महिला सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमावेळी महिलांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. प्रसंगीच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तालुक्यातील नारीशक्तीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान ही करण्यात आला.
पुढे बोलताना, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात केंद्र व राज्य सरकार गोरगरीब, निराधार, युवक, आदिवासी, वंचित आणि महिला वर्गासाठी विविध कल्याणकारी योजनांची आखणी करून त्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तर क्रांतिकारी ठरली आहे. विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक पात्र भगीनीने सदर योजनेच्या लाभासाठी फार्म भरावा. काही विघ्नसंतोषी विरोधक तुम्हाला चुकीची माहिती देऊन फेक नरेटिव्हनुसार भुलथापा देतील परंतू अशा खोटारड्यांच्या कोणत्याही फेक नरेटिव्हकडे लक्ष न देता महिला भगीनींनी शासनाच्या सर्वच योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा. महिला स्वावलंबी होऊन सक्षम व्हाव्यात यासाठी आपल्या महायुती सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. सरकारी योजना, शासनाचे विविध निर्णय व उपक्रम या सर्वांची माहिती व लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे भेट देऊन जास्तीत जास्त बहिणींनी आपला लाभ निश्चित करावा, असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.
या कार्यक्रमात मंचावर जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, प्रमोद कोडापे, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, कोरपना शहर अध्यक्ष अमोल आसेकर, किशोर बावणे, सरपंचा मेघा पेंदोर, उपसरपंच पुरूषोत्तम आस्वले, अर्चना भोंगळे, नुतनकुमार जिवणे, रवी बंडीवार, मनोहर चव्हाण, अशोक झाडे, निखिल भोंगळे, विशाल अहिरकर, सचिन आस्वले, दुर्गा पेंदोर, कैलास डाखरे, हनुमान रोगे, संजय नित, कैलास ताकसांडे, बंडू जोगी, हरी बोरकुटे यांचेसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका तसेच महिलाभगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS