प्रतिकृतींच्या माध्यमातून किल्ले संवर्धनाची शिकवण

HomeNewsचंद्रपूर

प्रतिकृतींच्या माध्यमातून किल्ले संवर्धनाची शिकवण

10 प्रतिकृतींचे विद्याथ्र्यांनी घडविले दर्शन

गौतम नगरी चौफेर (कोरपना):- गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात विद्याथ्र्यांसाठी ऐतिहासीक वास्तू प्रतिकृती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्याथ्र्यांना प्रतिकृतींच्या माध्यमातून किल्ले संवर्धनाची शिकवण मिळाली आहे.
इतिहास अभ्यास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण सेवा योजनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम फिजा पठान, द्वितीय प्रसराम चावरे व इश्वर तुमराम यांच्या गृपने पटकाविला तर तृतीय क्रमांक श्रेया निकोडे यांच्या गृपने पटकाविला. इतिहास विभाग प्रमुख प्रा. प्रदिप परसुटकर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे परिक्षण प्रा. डाॅ. शरद बेलोरकर व प्रा. आशिष देरकर यांनी केले.
प्रदर्शनीला संस्थेचे उपाध्यक्ष विकास भोजेकर, सचिव धनंजय गोरे, प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांनी भेट देऊन विद्याथ्र्यांचे कौतूक केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुधिर थिपे यांनी केले तर आभार प्रा. सचिन भैसारे यांनी मानले. प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

COMMENTS