गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) – जळगाव महापालिका निवडणुक घेण्याची गरज नाही.सबळ कारण आहे . रस्ता बांधकाम ठेका माजी उपमहापौर ने घेतला होता. रेतीचा ठेका दुसरा उपमहापौर ने घेतला होता.गिरणा पंपीगची जुनी पाईप लाईनचा ठेका महापौर कडे होता.डान्सबार आणि कॉल सेंटर चा ठेका माजी महापौर कडे होता. गटार बांधकाम ठेका आमदारांचे भाचे जावाई कडे होता. कचरा आणि सफाई चा ठेका स्वतः मंत्री कडे होता. आठवडा बाजार कर वसुली चा ठेका माजी महापौर कडे होता. घरकुल बांधकाम ठेका माजी मंत्री ने घेतला होता. दारू दुकानाचा ठेका नवीन आमदार कडे आहे.खून करायचा ठेका महापौर कडे होता.२७९ ओपन स्पेस चा ताबा नगरसेवक कडे आहे.बांधकाम मंजुरी चा ठेका महापौर कडे असतो. कम्प्लीशन सर्टिफिकेट चा ठेका विरोधी पक्षनेता कडे असतो. तर मग ३०००. कर्मचारी नोकरीवर ठेवण्याची गरज काय?

नगरसेवक, महापौर, आमदार हिच माणसे महानगरपालिका चालवत होती आणि चालवतील तर गिरीश महाजन यांचा फायदा आहे कि तोटा?
जळगाव मनपाचे दवाखाने विकून टाकले. शाळेच्या इमारती खाजगी संस्थांना देऊन टाकल्या. गार्डन पण गहाण ठेवले. तर मग महानगरपालिका चालवायची कशाला? कर वसुली का करायची?
म्हणून जळगाव चे सुज्ञ आणि समजदार नागरिकांनी जळगाव चा ताबा गिरीश महाजन यांचेकडे पांच वर्षासाठी सोपवून निर्धास्त राहिले तर बिघडले कुठे? निवडणुक, प्रचार, मतदान, निकाल हा देखावा करू नये. गिरीश भाऊ सांगतील त्या ७५ लोकांना नगरसेवक निवड प्रमाणपत्र तयार करून कलेक्टर ची सही घेऊन आजच वाटप करा. टाळी वाजवायला रोजंदारीवर बाया माणसे आणता येतील.
असेही जळगाव शहरातील डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक यांना या राजकारणात रस नाही. आपण भले आणि आपले काम भले. जर एखादे काम पडले तर लांच देऊन करून घेता येते. नाही लांच दिली तर काम होतच नाही. तर मग पैसा कमवा, लांच द्या आणि काम करून घ्या.असे बोर्ड जळगाव महापालिकेच्या दर्शनी भागावर लावा. चौका चौकात बैनर लावा. जेथे गुंड बदमाष गुन्हेगारांचे थोबडे दिसतात.
मला वाटते जे करायचे ते इमानेइतबारे केले पाहिजे. चोरी करायची असेल, लांच घ्यायची असेल तर त्यात पारदर्शकता आणली पाहिजे. शहराचा विध्वंस करायचा असेल तर दुर्योधन दुःशासन सारखा भर सभेत, आई बाप समोर केला पाहिजे. परिणाम काय होईल ते भगवान श्रीकृष्ण सांगतीलच. आता मी सांगून कळणार नाही. कारण या अवस्थेत ऐकण्याची कौरवांची मानसिकता नाही. धृतराष्ट्राची तर मुळीच नाही. गांधारी स्वताचे मत व्यक्त करणार नाही. भिष्माचार्य कडे दुसरा पर्याय उरलेला नाही. कर्ण मैत्रीला पाठ फिरवणार नाही. कृपाचार्य, द्रोणाचार्य भाकरीशी बेईमानी करणार नाहीत. विदुर काकांचे कोणी ऐकून घेणार नाही. एकच मार्ग शिल्लक उरतो. महर्षी व्यास ऋषींना बोलवून हे सर्व महाभारत लिहायला सांगा. महानगरपालिकेच्या सतराव्या मजल्यावर बसून. किमान पुढील पिढ्यांना कळेल तरी जळगावचा नाश कोणी आणि कसा केला?
…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
जळगाव जिल्हा अध्यक्ष
प्रहार जनशक्ती पक्ष.

COMMENTS