श्रीतेज प्रतिष्ठानचे निलेश ताजणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
गोंडवाना पक्षाचा पाठिंबा
शेतकरी संघटना ९, गोंडवाना २, श्रीतेज गट ९
गौतम नगरी चौफेर (संतोष पटकोटवार गडचांदूर:) – गडचांदूर येथे ॲड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलेश ताजणे असतील. शेतकरी संघटना ९, गोंडवाना २, श्रीतेज गट ९ असा फॉर्म्युला असेल अशी माहिती शेतकरी संघटना ज्येष्ठ नेते विलासराव धांडे, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप, गोंडवानाचे पांडुरंग जाधव, रामा मोरे, संतोष पटकोटवार, ख्वाजा भाई यांनी दिली. या सर्व उमेदवारांचे नामांकन अर्ज आज दाखल करण्यात आले.

गडचांदूर शहरात शेतकरी संघटनेचा निर्णायक पारंपरिक मतदार आहे. ग्रामपंचायत असताना त्यांनी सत्ता देखील मिळवली होती. प्रत्येक प्रभागात तुल्यबळ कार्यकर्ते आजही आहेत. गोंडवाना पक्षाचा देखील आदिवासीबहुल भागात प्रभाव आहे. तसेच श्रीतेज प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने गडचांदूर शहरात सर्वदूर विविध उपक्रम राबविले आहेत. दरम्यान काँग्रेस पक्षासोबत अनेक वर्षांपासून असणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अरुण निमजे, माजी नगरसेवक राहुल उमरे, रऊफ खान हे नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी करू शकतात. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शरद जोगी हे देखील नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे. नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार आहे.

पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक होणार आहे. गडचांदूर शहराचा विकास करण्याची दृष्टी असणारा उमेदवार लोक निवडून देतील असे मत शहर विकास आघाडीचे संयोजक ॲड. दीपक चटप यांनी मांडले.


COMMENTS