HomeNewsनागपुर डिवीजन

जडवाहनांमुळे गाडेगाव रस्ता अती खराब नागरिकांची गैरसोय

गौतम नगरी चौफेर (हसंराज धोटे गाडेगाव) – कोरपना तालुक्यातील आवाळपूर ते गाडेगाव जडवाहनांमुळे  हा रस्ता अतिषय खराब गिट्टिमय रस्ता झाला असल्याने  येथिल प्रवाशांची व नागरिकांची मोठी गैरसोय  होतांना दिसुन येत आहे. आवाळपूर ते गाडेगाव मार्गावरून सातत्याने सुरू असलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावीस अशी मागणी  गाडेगाव येथिल सरपंच गिता राजुरकर, माजी सरपंच शारदा झाडे , सुरज मुठलकर, कमलाकर राजुरकर, संदिप लोहे, रविदास करमनकर, किशोर टोंगे यांनी केली आहे. आवाळपूर पासून ते  गाडेगाव पाण्याच्या टाकीपर्यंतचा रस्ता अत्यंत अरुंद असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड व अवजड वाहनांची वर्दळ सुरू आहे. रस्त्याची रुंदी कमी असल्याने समोरासमोर येणाऱ्या वाहनांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार व पादचारी यांना जीव मुठीत धरून या मार्गावरून ये-जा करावी लागत आहे.

जड वाहनांमुळे गावकरी व दुकानदारांचे व्यवसायही बाधित होत असून, ग्राहकांना गडचांदूर बाजारपेठेत येण्यास अडथळे निर्माण होत आहेत. अनेकवेळा वाहतूक ठप्प होत असल्याने रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात एखादी मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ही समस्या अत्यंत गांभीर्याने घेत प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी सरपंच्यासह नागरीकांनी  केली आहे. जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करणे, आवाळपूर ते गाडेगाव मुख्य मार्गावर जड वाहनांना वेळेचे बंधन घालणे किंवा वाहतूक नियंत्रणासाठी ठोस नियम लागू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. सर्व अधिकाऱ्यांनी समस्या समजून घेत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन समजुन  हा रस्ता गिट्टिमय  असल्याने मजबुत रस्ता बनवूदेण्यची मागणी होत आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page