गौतम नगरी चौफेर (कोरपना) – या जगाला सगळीकडे शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवायची असेल तर आपल्या दैनंदिन व्यवहारात धम्म, नीती अर्थात सुनीती अर्थात सद्धम्म अर्थात आदर्श विचारांच्या आचरणाची गरज आहे. हेच महान कार्य अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत बुद्ध यांनी विनयपीठकांच्या माध्यमातून सद्धम्मांकीत संविधान देऊन केले आणि तथागत बुद्धांच्या नंतर अडीच हजार वर्षांनंतर आधुनिक बुद्ध महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणखी या जगाला दुसऱ्यांदा आदर्श संविधान दिले आहे. म्हणून भारतीय संविधान हे तमाम भारतीयांच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील हक्क आणि अधिकाराच्या आचरणाची सनद आहे. भारतीय संविधानाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची संपूर्ण जबाबदारी एक भारतीय म्हणून आपली सर्वांची असून आपले हरेक क्षेत्रातील पदाधिकारी नेत्यांच्या मनमानी पद्धतीने आणि नियुक्ती न करता संविधानानुसार निवडणूकीद्वारे बहुमताने निवडण्याची गरज आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी केले.
रिपब्लिकन कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सन्मान विचार मंच, ता. वाडा तर्फे दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ ला स्थळ- पष्टे मैदान, कुडूस (नाका) ता. वाडा जि पालघर आयोजित संविधान सन्मान रॅली व संविधान जागर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमांत भगिरथ भोईर, मुस्तफा मेनन, नवनाथ जाधव, संतोष साटम, ऋषिकेश सावंत, शौर्य शिंदे इत्यादींनी संविधानावर आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद अडकमोळ यांनी प्रास्ताविक नरेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन सुरेश कांबळे यांनी केले.
सायंकाळी पाच वाजता कुडूस येथे संविधान सन्मान रॅली काढून संविधानाचा जागर करण्यात आला. या जागर मिरवणुकीत सर्व भारतीय समाज बांधव आबालवृद्ध, महिला- पुरूष सहभागी होऊन संविधानातील एकता आणि एकात्मता यांचे दर्शन घडविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश भोईर अध्यक्ष, अपाध्यक्ष मंदा कांबळे, सचिव रश्मी भोईर, खजिनदार वसंत जाधव, अशोककुमार उमरे, संजय जाधव, मिलींद पंडित, मुस्तफा मेनन, नवनाथ शिंदे, पा. ना. जाधव, नरेश जाधव, सुभाष मोर, सदानंद आकडमोळ, इरफान मुसे, नरेंद्र मोरे, मंदा बोरकर, विनायक जाधव, रुपेश जाधव, रमेश थोरात, रमेश धुळे, इत्यादींनी परिश्रम घेतले.
COMMENTS