माणुसकीचं जिवंत उदाहरण
गौतम नगरी चौफेर (गडचांदूर) कोरपना: सार्वजनिक जीवनात अनेकजण पद गेल्यावर सामाजिक कार्यांकडे दुर्लक्ष करतात, पण कोरपना पंचायत समितीचे माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान पठाण यांनी एक वेगळीच माणुसकीची ओळख निर्माण केली आहे.
रविवारी सकाळी अस्वच्छ स्थितीत, दाढी वाढलेली, फाटके कपडे घातलेली एक अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या कडेला असहाय्य अवस्थेत आढळून आली. हे दृश्य पाहून रऊफ खान यांनी तातडीने पुढाकार घेत त्या व्यक्तीची दाढी, कटिंग करून घेतली, स्वच्छ कपडे व ब्लँकेट दिले आणि त्याला गरम जेवण पुरवले. या माणुसकीच्या कार्यामुळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या काळात जिथे माणूस माणसाला ओळखत नाही, तिथे रऊफ खान यांचा हा सेवाभाव समाजाला प्रेरणा देणारा ठरतो आहे.

COMMENTS