शंकरदेव देवस्थानाच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही! – देवराव भोंगळे

HomeNewsनागपुर डिवीजन

शंकरदेव देवस्थानाच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही! – देवराव भोंगळे

नोकारी (खुर्द) येथील शंकरदेव देवस्थानात १० लक्ष रुपयांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचे भुमिपुजन.
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी नांदाफाटा) – भगवान महादेवाची कृपा अखंड आहे. महादेवाचा आशिर्वाद असेल तर कुठेही आणि कशाचीही कमी पडत नाही. त्यामुळे या पवित्र शंकरदेव देवस्थानाच्या विकासाकरीता मी नेहमी तत्पर राहिलो आहे. मागील काळात या देवस्थानाचा कायापालट व्हावा म्हणून मला देता येईल तेवढे योगदान मी दिले, तसेच यापुढेही या देवस्थानाच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास भाजपचे विधानसभा निवडणुक प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला. राजुरा तालुक्याच्या टोकावर असलेल्या श्री शंकरदेव देवस्थान येथे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकरीता उभारण्यात येत असलेल्या १० लक्ष रुपयांच्या विकासात्मक कामाचे भुमिपुजन त्यांच्या हस्ते पार पडले; यावेळी ते बोलत होते.

जिवती रोडवरील नोकारी (खुर्द) – बैलमपुर नजीक असलेल्या श्री शंकरदेव देवस्थान येथे तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारणेकरीता मंजूर झालेल्या १० लक्ष रुपयांच्या विकासकामाचे आज (दि. ०८) भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले.

पुढे बोलतांना, या देवस्थानाच्या विकासासाठी आणि विशेषतः याठिकाणी येणाऱ्या दर्शनार्थींना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीलो आहे. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतांना शंकरदेव देवस्थानासाठी ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र म्हणून अनेक विकासकामे करता आली. याठिकाणी स्टिल रेलींग व पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच पायऱ्याच्या बांधकामाचाही त्यात समावेश आहे. येत्या काळात याठिकाणी १५ लक्ष रुपयांच्या सभामंडपाचेही काम आपण करणार आहोत. या देवस्थानात महाशिवरात्री, मार्गशीर्ष महिन्यात तसेच नवरात्रीतही मोठ्या संख्येने भाविकभक्त आस्थेने येतात. त्यामुळे त्यांना योग्य सोईसुविधा मिळतील यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आम्ही संकल्पबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला माजी जि. प. सभापती सुनिल उरकुडे, सरपंच मनिषा पेंदोर, आयोजक तथा उपसरपंच वामन तुराणकर, ईसापुरच्या सरपंचा शुभांगी आत्राम उपसरपंच दिनेश ठाकरे, मानोली खुर्द चे उपसरपंच गणेश नैताम, जामणीचे उपसरपंच अशोक चांदेकर, रामू पा. कोरांगे, नागेश गेडाम, राकेश गेडाम, साधनाताई नागोसे, कर्नु पा. आदे, लताताई उईके, जंगू आत्राम, शिवमूर्ती गायलाड, लक्ष्मी ताई परचाके, लताताई परचाके, उज्वलाताई झोडे, अशोक कोटनाके, शंकर आदे, नामदेव न्याहारे, रमेश राऊत, नत्थूजी निकोडे, भुजंगराव आत्राम, केशव कुळमेथे, श्रीधर अडतकर, गणेश कुळमेथे, सुलभ बालाजी वडस्कर, वैशाली महाडोळे, अजित ठाकरे, भिवसन आदे, नीलकंठ निकोडे, बालाजी बोळे, व इतर ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.

COMMENTS