ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

HomeNewsनागपुर डिवीजन

ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

गौतम नगरी चौफेर (बादल बेले राजुरा) – ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयात आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी क्रीडा महोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. क्रीडाजगताचे दैवत, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष सतीश धोटे यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. अर्पित धोटे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, अमेय धोटे तसेच महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख हे उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात, असे प्रतिपादन केले. या क्रीडा महोत्सवात खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ आदी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले असून, खो-खो या सामन्याने क्रीडा महोत्सवाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी आपला संघ तयार करून या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अल्पना कवाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. मंगेश कुळमेथे यांनी केले.

COMMENTS

You cannot copy content of this page