वामनराव चटप आणि सुभाष धोटे  दोघेही ओबीसी समुदायांच्या आरक्षणाच्या विरोधात आहे – भुषण फुसे

HomeNewsनागपुर डिवीजन

वामनराव चटप आणि सुभाष धोटे  दोघेही ओबीसी समुदायांच्या आरक्षणाच्या विरोधात आहे – भुषण फुसे

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी भोयगाव) – माजी आमदार वामनराव चटप व विद्यमान आमदार सुभाष धोटे हे दोघेही ओबीसी समुदायाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. जेव्हा मनोज जरांग यांनी ओबीसी मधून आरक्षण मागितले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे व ओबीसी समुदायाच्या लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला.‌ रास्ता रोको आंदोलन जेलभरो आंदोलन आमरण उपोषण केले. परंतु या आजी माजी आमदारांनी ओबीसी समाजाच्या आंदोलनाला कुठलेही समर्थन दिले नाही, कोणतेही सहकार्य केले नाही.
माजी आमदार वामनराव जाधव यांनी ओबीसी विरोधक बच्चू कडू यांना गडचंदूरला बोलावून सभा घेतली आणि ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. बच्चू कडू हे जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत.‌ बच्चू कडू ची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी समाजा मधून आरक्षण देण्यात यावे. म्हणून वेळ आली आहे आता ओबीसी समुदायाने या दोन्ही आजी-माजी आमदारांना मुळीच मतदान करू नये.

COMMENTS