गौतम नगरी चौफेर आवारपूर (डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समीती व आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने आवारपूर येथील भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीद शुरवीरांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या मुलरलिधर वानखेडे होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते पुतळा समितीचे गौतम धोटे, रमेश खाडे, प्रमोद चांदेकर, दर्शन बदरे, सुरेश दिवे, प्रज्ञाशिल खाडे व आई रमाबाई महिला मंडळाच्या पुष्पाबाई बदरे, शिला धोटे, चेतना खाडे, शुद्धलेखा खाडे, यशोधरा चांदेकर,शितल ठमके, कल्याणी वानखेडे, सविता नारनवरे, धम्माबाई जीवने, सविता बदरे, गिरजाबाई चांदेकर, स्मिता बदरे, चैताली वानखेडे, सोनी सातपुते, श्नेया धोटे, आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहारहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी एक मिनिट स्तब्ध राहून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात केली. यावेळी कार्यक्रमाला समितीचे व बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शन बदरे यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले



COMMENTS