डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताहनिमित्याने निःशुल्क नेत्र तपासणी.

HomeNewsनागपुर डिवीजन

डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताहनिमित्याने निःशुल्क नेत्र तपासणी.

– २२ पात्र रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर येथे रवाना.

– मोतीबिंदू रुग्णांना पाणी व बिस्कीट वाटप.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. १० जून डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताहनिमित्याने उप जिल्हा रुग्णालय राजुरा येथे निःशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेत्रदान सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, समता फाउंडेशन मुंबई तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफडो) शाखा राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आयोजित निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना पाणी व बिस्कीट वाटप करण्यात आले. डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताहानिमित्त राबविण्यात येत असलेल्या जनजागृती उपक्रमांतर्गत या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना प्रवासादरम्यान व प्रतीक्षेच्या काळात आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांना मानसिक आधार मिळावा या उद्देशाने पाणी व बिस्कीट वाटप करण्यात आले. तसेच आलेल्या सर्व नेत्र रुग्णांची तपासणी करून पात्र २२ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर येथे पाठविण्यात आले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, समता फाउंडेशन मुंबई तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकी जपत विविध संस्थांनी एकत्र येऊन रुग्णसेवेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक जाधव, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. मनोज शेंडे, नेत्र चिकित्सा अधिकारी प्रिझम भैसारे, सेवानिवृत्त नेत्र चिकित्सा अधिकारी शंकरराव बुऱ्हाण, डॉ. साक्षी सांघवी, समता फाउंडेशनचे असोसिएट विशाल उईके, आरोग्य अधिकारी आकाश निकुरे, नेफडोचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, अनंता डोंगे, रूपेश बुऱ्हाण, नरेंद्र देशकर, संतोष कुमार चंदनखेडे, रवी बुटले, माधुरी निखाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा, तसेच मोतीबिंदूसह विविध नेत्रविकारांबाबत जागरूक राहून वेळेवर तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले.

You cannot copy content of this page