मताधिक्य रोखणार ? ; राजुरा विधानसभा क्षेत्रात चर्चा
गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) – राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा धुरळा चांगलाच उडत आहे.होता राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे पक्षांच्या उमेदवारांचे मताधिक्यांचे गणित बिघडणार आहे, अशी चर्चा संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढत असलेले देवराव भोंगळे हे भारतीय जनता पक्षातून आयात केलेले उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते किती जोमाने काम करतात?, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणि शिवसेना (शिदे) रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भोंगळे यांचा स्वीकार करून त्यांच्यासाठी जोमाने काम करतात काय ? असा प्रश्न मतदारसंघातून उपस्थित केला जात आहे. यावेळी कमळ चिन्हावर देवराव भोंगळे निवडून जर आले तर या मतदारसंघात भाजपचे अस्तित्व
विधानसभा निवडणूक २०२४ शिल्लक राहणार नाही, की नाही असेही बोलले जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात दुखत आहे. तसेच उमेदवारी तसे भोंगळे येथील राजुरा क्षेत्रात दमदार आहेत .न उमेदवारी मिळाल्याने माजी आमदार नाराज झालेले भारतीय जनता पक्षाचे संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी खरोखर अगर प्रचाराला सुरवात केली तर नक्कीच भोंगळे निवळणूक जिंकेल . तसेच महाविकास आघाडीतर्फे मतदारसंघातील विद्यमान आमदार सुभाष धोटे यांना कॉंग्रेसने तिकीट दिली. त्यामुळे राजुरा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रचार गाव भेटी जोमाने सुरू आहेत .गेल्या कित्येक दिवसापासून जो गाव खेड्यात नाही त्या ठिकाणी विद्यमान सुभाष धोटेच्या वतीने भरपूर विकास कामे केली असल्याने यावेळी भोंगळे आणि धोटे यांच्यात सरळसरळ सामना रंगण्याची खात्री अनुभव लोकांच्या तोडून ऐकायला येत आहे.
दरम्यान शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा जुन्या चेहऱ्यावर डाव खेळला आहे .शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी सतत तीनदा या राजुरा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले दरम्यान रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (ए च्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा प्रियाताई खाडे , सामाजिक कार्यकर्ते भुषण फुसे यांनी संभाजी ब्रिगेड यांच्या संघटनेतून उमेदवारी मिळवून घेतली. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण राजुरा विधानसभा क्षेत्रात आहे.
बहुजन समाज पार्टी च्या वतीने अभय डोंगरे यांच्याही हत्ती चिन्हे घेऊन गाव भेटीत या सर्व पक्षापेक्षा एक पाऊल पुढेच दिसत आहे , तर अपक्ष निनाद बोरकर यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्र पालथून प्रचार गावागावात सभा घेऊन मतदारांना आपल्या कडे मतदान करण्यासाठी आवाहन केले तर वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने गजानन जुमनाके यांनी ही निवडून येणार असे भाकीत धरून चांगला
जोमाने प्रचार केला सह या विधानसभा क्षेत्रात एकूण १४ उमेदवारांना अक्षरशः मी निवडून येणार आणि या क्षेत्रातील आमदार होणार या अनुषंगाने सर्व परी जोर धरून आहेत
मतदारांना आकर्षित करण्याची लागली पैज
• राजुरा : विधानसभेचे सदस्यत्व प्राप्त करवून सत्तेचा उपभोग घेण्यासाठी प्रत्येक पक्षातर्फे मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाभांश योजना जाहीर करण्याची पैज सुरू झाली आहे. मोठे नेतेमंडळीच्या प्रचारसभा मुख्य ठिकाणी होऊ लागल्या आहेत. आमदार बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी वाटेल तेवढे रुपये खर्च करण्याची तयारी असते. परंतु, जागा एक मागणाऱ्यांची संख्या अनेक, त्यामुळे अनेकजण पक्षातंर करून उमेदवारी मिळवून घेत आहेत. सत्तेसाठी आकर्षित करणाऱ्या योजनांचा महापूर सोडून सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, प्रत्यक्षात या योजना अमलात आणल्या जात नसल्याने गावखेड्याच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी राजकीय पक्षाकडे उत्तर नाही. या निवडणुकीत पार्सल उमेदवार असल्याने खरा समाजसेवक कोण असा प्रश्न मतदारांसमोर उभा आहे.
त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांचा या निवडणुकीत कस लागणार आहे, हे निश्चित.
अपक्षांनी वाढवली डोकेदखी हेच तर महायुती व महाविकास आघाडी यांचे भवितव्य ठरविणार असल्याचेही बोलले जाते.
COMMENTS