आज मात्रुत्व दिवस.मला मिळालेला पुरस्कार त्यानिमित्ताने आईला समर्पित

HomeNewsनागपुर डिवीजन

आज मात्रुत्व दिवस.मला मिळालेला पुरस्कार त्यानिमित्ताने आईला समर्पित

गौतम नगरी चौफेर (प्रभाकक्ष खाडे ) – वंदना विनोद बरडे अधीसेवीका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर
मे महिन्याचा दुसरा रविवार म्हणजे मात्रुत्व दिवस. तिच्या प्रेमाची कश्याने भर होऊ शकतं नाही असं ओतप्रोत प्रेमाने भरलेली माया फक्त आईच देवु शकते. अश्या मात्रुप्रेमाचा दिवस. मात्रुत्व दिनाच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. दिनांक १० मे २०२५ ला गगनभरारी समर्थ पुरस्कार सोहळा पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला. यामध्ये २१ कर्तृत्ववान व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनाही गगनभरारी समर्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. वंदना विनोद बरडे यांनी आपलीं आई त्रीवेणी नामदेवराव लव्हाळे यांना तो समर्पित केला. आईचे रूण कोणीच फेडु शकत नाही. पण आपण आईला काही तरी दिल पाहिजे. म्हणुन आजचा अवार्ड माझ्या आईला समर्पित करते. आज ति बेडरिडन आहे पण माझी ती शक्ती आहे. तिला माझ्या सोबत येता येत नाही. बोलता येत नाही पण तिला माझ्या व मला तिच्या भावना कळतात. जिन आपलं सुख दुःख बाजुला ठेवून मला तेवढं तत्पर बनवलं ते तिच्या हिम्मतिवर. तिच्या हिम्मतीला व जिद्दीला आजचा पुरस्कार.

COMMENTS

You cannot copy content of this page