जिवती पोलिसांची गांजा विक्रेत्याच्या घरी धाड गांजा विक्रेत्याला केली अटक

HomeNewsनागपुर डिवीजन

जिवती पोलिसांची गांजा विक्रेत्याच्या घरी धाड गांजा विक्रेत्याला केली अटक

गौतम नगरी चौफेर हकानी शेख  प्रतिनिधी जिवती:- पोलीस स्टेशन जिवती येते दि.२८ अगस्ट रोजी गुप्त माहिती मिळाली की शेणगाव येथे राहणारा संभाजी उर्फ पिंटू शिवाजी कत्ते हा इसम स्वतःच्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा बाळगून चिल्लर विक्री करीत आहे. अशी गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती पोलीस स्टेशनला पथक तयार करून पथक मधील प्रवीण जाधव सपोनि, पोउपनि निखिल रहाटे, पोहवा नारायण गवाले,पोअ जगदीश मुंडे, ज्ञानेश्वर डोकळे, किरण वाटोरे, भाविक टेकाम, अभिषेक आडे, प्रियंका राठोड, शिल्पा कातकर, यांनी दोन पंचासमक्ष सदर आरोपीचे घराची झेडपी घेतली असता आरोपीच्या घराची स्वयंपाक खोली मधून एका निळ्या रंगाचे ड्रम मध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एकूण ८६० ग्राम गांजा एकून किंमत ८६०० रुपयेचा निवडून आला असल्याने सदरचा गांजा पंचासमक्ष जप्ती करून कारवाई करण्यात आली असून सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन जिवती येथे अपराध क्रं.११४/२०२५ कलम ८(क), २०(ब) NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन जिवती येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल राहटे हे करीत आहेत.

COMMENTS

You cannot copy content of this page