ग्रा.प.पाचगाव व ग्रामस्थांकडून मृतात्म्यास श्रध्दांजली.

HomeNewsनागपुर डिवीजन

ग्रा.प.पाचगाव व ग्रामस्थांकडून मृतात्म्यास श्रध्दांजली.

पाचगाव येथे गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा ३० ऑगस्ट
      राजुरा- गडचांदूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रं.३५३-ब वरील कापनगाव जवळ ग्रिल कंपनी द्वारे महामार्गाचे काम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी योग्य दिशादर्शक व बैरिकेट न लावल्याने व कंपनीच्या गलथान कारभारामुळे प्रवासी अॅटो व कंपनीच्या हायवा ट्रक मध्ये झालेल्या भिषण अपघातात अॅटो चालकासह सहा व्यक्तींना जिव गमवावा लागला.
       मृतांमध्ये पाचगाव येथील चार तर लगतच्या कोची येथील एक व खामोना येथील एक अशा सहा जणांचा समावेश होता. अपघातात गंभीर जखमींमध्ये पाचगाव एक महिला तर भुरकुंडा येथील एका पुरूषाचा समावेश आहे.
         एकाच वेळी सहा व्यक्ती मृत पावले व पाचगाव येथील चार व्यक्तीचा समावेश असणे ही या परिसरातील पहिलीच घटना असल्याने पाचगाव वासियांवर शोककळा पसरली. पाचगाव येथे  दि. २९ ला सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
        ग्राम पंचायत पाचगाव व ग्रामस्थां कडून दि.३० आॅगस्ट ला छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामुहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.या वेळी ग्राम पंचायत पदाधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण गाव दुःखात असल्याने पाचगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळाने या वर्षी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS

You cannot copy content of this page