कोरपना येथील बंद पडलेला बांबू डेपो सूरू करावा,,,

HomeNewsचंद्रपूर

कोरपना येथील बंद पडलेला बांबू डेपो सूरू करावा,,,

⭕️संतोष पटकोटवार यांनी वनविभाग व जिल्हा अधिकारी यांचे कडे केली मागणी

गौतम नगरी चौफेर (गडचांदूर) – चंद्रपूर जिल्ह्यातील अती दुर्गम भागात कोरपना हे शहर वसलेले आहे, कोरपना येथे अनेक वर्षांपासून बूरुड कामगार वास्तव्य करीत आहेत ,हिरव्या बांबू पासून निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू तयार करणे व आपल्या मुलांबाळांचे पालनपोषण करणे हे त्यांचे पारंपरिक व्यवसाय आहे, शासन निर्णयानुसार प्रती कुटुंब धारकाला वार्षिक एक हजार पाचशे नग हिरवा बांबू पुरवठा  वनविभा मार्फत करण्यात येत होता परंतु सन 2018 पासून वनविभागाने सवलती दरात मिळणारा बांबू पुरवठा बंद केल्याने बूरुड कामगारांवर ऊपासमारीची वेळ आली असून दारिद्र्याचे जिवन जगावे लागत आहे, बूरुड कामगारांना ऊतमरितीने जीवन जगण्यासाठी शासना मार्फत सवलती दरात हिरवा बांबू पुरवठा केला जातो या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाची अमलबजावणी वनविभागाने वेळोवेळी करावी  बूरुड कामगारांना नियमित पणे हिरवा बांबू पुरवठा करून सहकार्य  करावो, व कोरपना येथील बंद पडलेला बांबू डेपो सूरू करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार यांनी वनविभाग कार्यालय  मध्य चांदा चंद्रपूर व जिल्हा अधिकारी चंद्रपूर यांच्या कडे केली आहे,

COMMENTS