*▪️ रमाई आणि बाबासाहेब (अंतिम क्षण.)*▪️
१९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईंचा आजार वाढतच चालला होता. औषधोपचार ही लागू होत नव्हते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब रमाईंच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई बाबासाहेबांकडे एकटक पाहत बोलण्याचा प्रयत्न करत पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असेच आणि कॉफी किंवा मोसंबी रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करत असत.
बाबासाहेब रमाई जवळ गेले त्यांचा हात हातात घेतला आणि म्हटलं, “लवकर बरी हो, तुला अजून चांगल्या दवाखान्यात न्यायचे आहे.” त्यावर रमाई म्हणाल्या,” साहेब आता त्याची आवश्यकता नाही. माझी जाण्याची वेळ झाली आहे. साहेब, मी अनेक मृत्यू पाहिले, मला मृत्यूची भीती वाटत नाही.”
अशा त्यागमूर्ती माता रमाई यांच्या ९० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन💐💐💐
▪️अभिवादक ▪️
💙 आयु. शिला गौतम धोटे 💙


COMMENTS