अड्याळ येथे महामानव बोधिसत्व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

HomeNewsनागपुर डिवीजन

अड्याळ येथे महामानव बोधिसत्व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – पवनी तालुक्यातील अड्याळ येथे वैशाली बुद्ध विहार व सुबोध बुद्ध विहार बाजारपेठ येथे महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच शिवशंकर मुंगाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण, डॉ.गणेश मेश्राम, प्राचार्य अशोक वाहने, पत्रकार विशाल रणदिवे, ताराबाई कुंभलकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, माधुरी मुंडले, वैशाली देशमुख, हिरालाल खंडाईत, डॉ. शीला मेश्राम, प्राध्यापक जांभुळकर, आशिक नैतामे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत सर्वप्रथम महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध व महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या सभेला डॉ गणेश मेश्राम, सरपंच शिवशंकर मुंगाटे, पत्रकार संजीव भांबोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या ताराबाई कुंभलकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार वैशाली बुद्ध विहाराचे अध्यक्ष मुनीश्वर बोदलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रकाश दहिवले, चंदू कोडापे, गौतम जनबंधू, विकास टेंभुर्णे, अमोल थुलकर, देवाजी जांभुळकर, अर्जुन जनबंधू, इंजिनियर अनिकेत कोचे, नूतन बोदलकर, दिनेश्वरी वानखेडे, साधना कासारे, प्रतिमा जनबंधू, कृतिका डोंगरे ,वसुश्री टेंभुर्णे, लीना कोचे, मंजिरा कोचे, जयश्री चव्हाण, सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांनी सहकार्य केले.

COMMENTS

You cannot copy content of this page