आदर्श शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा.

HomeNewsचंद्रपूर

आदर्श शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा.

– निसर्गाला भक्तीची जोड देऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लावा.-बादल बेले

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा) – 10 सप्टेंबर बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काऊट -गाईड्स युनिट, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव -2024 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदर्श शाळेतील माजी विध्यार्थी यश गोपाल ठाकूर यांनी मातिपासुन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले, सोबतच विध्यार्थीनीही सहभागी होतं गणेश मूर्ती तयार केल्या. यावेळी यश ठाकूर यांना भेटवस्तु देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विविध सामाजिक, पर्यावरण संदर्भात संदेश विध्यार्थीनी दिले. गणपती पूजेला आवश्यक असलेल्या वृक्षाची लागवड करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले.

वातावरणातील होत असलेला बदल व त्याचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम  लक्षात घेता विध्यार्थीनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची शपथ यावेळी घेतली. निसर्गाला भक्तीची जोड देऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, आपण आपले अधिकार, हक्क स्वीकारताना कर्तव्याची जाणीव सुद्धा ठेवावी असे प्रतिपादन बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख यांनी केले. बादल बेले यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम घेण्यात आला. विध्यार्थीनी तयार केलेल्या गणेशमूर्तिची विधिवत पुजाअर्चना करून विसर्जन करण्यात आले. यावेळी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भास्करराव येसेकर, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक सारिपुत्र जाँभूळकर, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख क्रीडा मार्गदर्शक बादल बेले, स्काऊट मास्तर रुपेश चिडे, ज्योती कल्लूरवार, गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, वैशाली टिपले, जयश्री धोटे, कब बुलबूल लीडर सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, रजनी पिदूरकर, किसन वेडमे, प्राजक्ता साळवे, नवनाथ बुटले, मेघा वाढई, आशा बोबडे, प्रशांत रागीट, विकास बावणे, भाग्यश्री क्षीरसागर, वैशाली चिमुरकर, अंजली कोंगरे, पूजा बावणे, माधुरी रणदिवे, मनीषा लोढे, विध्यार्थी प्रमुख अनुष्का वांढरे, जय बुरडकर व सर्व विध्यार्थी -पालक आदींनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.

COMMENTS