अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या जन्मदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

HomeNewsनागपुर डिवीजन

अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या जन्मदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

गौतम नगरी चौफेर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.
चंद्रपूर-जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक मा.श्री.ईश्वर कातकडे साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त पोलीस मुख्यालय मधील ड्रिल शेड मध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या आयोजनाला चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी आरसीपी चे जवान महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे पदाधिकारी यांच्याकडून रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान श्रेष्ठदान या तत्त्वावर रक्तदान करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दल चंद्रपूर जिल्हा मधील अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री.ईश्वर कातकडे साहेब यांनी सुद्धा आपले स्वतःचे रक्तदान केले. तसेच मा.श्री. महेश कोंडावार, होम साहेब, चंद्रपूर मा.श्री. नवघरे साहेब, पोलीस मुख्यालय, राखीव पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा आपले अमूल्य रक्तदान केले. यादरम्यान महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राहुल भैय्या अर्जुनराव दुबाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष मा.श्री.आरती ताई सुधीर जांगळे यांची प्रमुख उपस्थिती लागली होती तसेच विदर्भातून विविध जिल्ह्यातून पदाधिकारी यांचे सुद्धा अमूल्य रक्तदान व उपस्थिती लाभली. त्यामध्ये विदर्भाचे सल्लागार मा.श्री.संतोषजी पुंडकर भंडारा जिल्हा अध्यक्ष चेतनदादा शर्मा अकोला जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.गौरवदादा अशोकराव सपकाळ व संपूर्ण जिल्ह्यातील संघटनेचा परिवार उपस्थित होता. संपूर्ण शिबिराचे आयोजक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.परमेश्वर बळीराम चव्हाण ह्यांनी राहुल भैय्या अर्जुनराव दुबाले यांच्या प्रमुख नेतृत्वात कार्यक्रम पार पाडला. यावेळी महाराष्ट्र पोलीस दल चंद्रपूर चे अधिकारी अंमलदार व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे महिला आघाडी अध्यक्ष शीला दिलीप जाधव युवक आघाडी अध्यक्ष विशाल राठोड मयूर घोटकर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रोहित दुरतकर विजय चव्हाण संघटक राहुल पोद्दार सोशल मीडिया प्रमुख मानव झाडे दिलीप जाधव प्रफुल मानकर कृष्णा मेश्राम भूपेंद्र जाधव  महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page