राजुरा येथे ४३ वे राज्यस्तरीय मराठी विषय शिक्षकांचे दोन दिवशीय वार्षिक कृतिसत्र उत्साहात संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा येथे ४३ वे राज्यस्तरीय मराठी विषय शिक्षकांचे दोन दिवशीय वार्षिक कृतिसत्र उत्साहात संपन्न.

गौतम नगरी चौफेर (सुवर्णा बेले राजुरा) – १९ जानेवारी
      महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ तालुका राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने ४३ वे राज्यस्तरीय मराठी विषय शिक्षकांचे दोन दिवशीय वार्षिक कृतीसत्र दिनांक १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे संपन्न झाले.
दि. १७ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून अरुण धोटे , नगराध्यक्ष, न.प.राजुरा यांची उपस्थिती होती. तर स्वागताध्यक्ष म्हणून ॲड . जयंतराव साळवे, अध्यक्ष ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून घनश्याम पटले, अध्यक्ष, म.म.मा. शि.सं., कृतीसत्राच्या अध्यक्षा रजनी शर्मा, सह संपादक आ.म.म. अध्यापक, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक विजयकुमार लांडगे, सातारा, कार्यवाह दुधराम राऊत, गोंदिया, कार्यकारी अध्यक्ष भरत गावडे, सिंधुदुर्ग ,डॉ. मंजुषा सावरकर, पुणे ,
अंतर्गत हिशोब तपासणीस पुरुषोत्तम गोंधळे, भंडारा, योगेशकुमार राहांगडाले, संपादक, आ.म.म.अध्यापक, गोंदिया, डॉ. किशोर कवठे , राजुरा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय मराठी विषय शिक्षकांच्या कृतीसत्राला राज्यातील व विशेषता सातारा, सिंधुदुर्ग, गोंदिया, पुणे, भंडारा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर येथील शिक्षक मोठ्यासंखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनदास मेश्राम, सह कार्यवाह यांनी केले.

तर प्रास्ताविक राजू डाहुले, अध्यक्ष यांनी केले. आभार दुधराम राऊत, राज्य कार्यवाह यांनी मानले. यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले राजुरा नगर परिषदचे नगराध्यक्ष अरुण धोटे म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून मराठी भाषेत व्यवहार करणे, बोलणे, आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सामुहिकपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे ही सर्वांचीच जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले. माजी अध्यक्ष विजयकुमार लांडगे यांनी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाची पार्श्वभूमी, इतिहास व कार्यपद्धती यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले. स्वागताध्यक्ष ॲड. जयंतराव साळवे यांनी मराठी भाषेचे महत्व, कथा, कविता, कादंबरी, गद्य पद्य यांचे महत्व विषद केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम पटले यांनी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे भविष्यातील उपक्रम, कार्यक्रम आणि मराठी भाषा विकासासाठी भाषिक कौशल्य विकसित करण्याचे आवाहन करीत संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी संघाच्या उपक्रात सहभागी होण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ राजुरा तालुका आयोजकांनी अथक परिश्रम घेतले.

——————————————–
*विशेष आकर्षण ग्रंथदिंडी*
मराठी विषयाचे विविध संदर्भ ग्रंथ, ग्रामगीता, कादंबऱ्या, भारताचे संविधान व आपला महाराष्ट्र मराठी अध्यापक तर्फे निघणारे त्रे मासिक तसेच विविध ग्रंथ असलेले ग्रंथदिंडी, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चे मुलींचे बँड पथक , लेझीम पथक विशेष आकर्षण ठरले.

——————————————–
*राज्यस्तरीय मराठी विषय शिक्षकांच्या वार्षिक कृतीसत्राची सुरुवात वृक्षारोपणाने*
महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ द्वारा घेण्यात आलेल्या या दोन दिवशीय राज्यस्तरीय कृतीसत्राची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली. यावेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा व पर्यावरण संवर्धनाचे जनजागृती करणारे फलक हातात घेऊन लक्ष वेधून घेतले.

——————————————–
(महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ द्वारा आपला महाराष्ट्र मराठी अध्यापक मार्फत काढले जाणारे त्रे मासिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.- मराठी भाषा संवर्धनासाठी सामूहिक कार्य गरजेचे.- अरुण धोटे, नगराध्यक्ष
– ग्रंथ दिंडी, वृक्षारोपण करून कृतिसत्राची सुरुवात.
– महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाने केले यशस्वी आयोजन)
——————————————

COMMENTS

You cannot copy content of this page