ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयात ‘माधवबाग’ आरोग्य शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयात ‘माधवबाग’ आरोग्य शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

गौतम नगरी चौफेर (बादल बेले  राजुरा) – ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा संचलित ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयात दिनांक 24 जुलै 2025 रोजी ‘माधवबाग आरोग्य शिबिर तथा मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या माधवबाग संस्थेच्या चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट व माधवबागचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर प्रभावी उपाय तसेच त्यावरील संशोधनविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यांनी निरामय जीवन जगण्यासाठी आवश्यक जीवनशैली आणि दिनचर्येचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व माजी आमदार ॲड. संजय धोटे होते. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव डॉ. अर्पित धोटे, माधवबागच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. प्रीती सरबेरे, असिस्टंट डॉक्टर ऑफ माधवबाग डॉ. साक्षी टोंगे, कम्युनिटी हेल्थ एक्झिक्युटिव्ह विनोद अय्यर, पंचकर्मा थेरेपीस्ट प्रमोद दुर्गे, तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक जागरूकतेचा बहुमोल संदेश देणारा व निरोगी आयुष्याच्या दिशेने प्रेरणा देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या वर्षा पोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आसावरी जिवतोडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. नम्रता ब्राह्मणे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

COMMENTS

You cannot copy content of this page