संकेत लांडे अखिल भारतीय रुट्स – २ स्पर्धेत शास्त्रीय हार्मोनियम श्रेणीत प्रथम.

HomeNewsचंद्रपूर

संकेत लांडे अखिल भारतीय रुट्स – २ स्पर्धेत शास्त्रीय हार्मोनियम श्रेणीत प्रथम.

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा) – राजुरा येथील वेकोली कामगार अरविंद लांडे यांचे चिरंजीव संकेत लांडे हा नवोदय विद्यालय, तळोधी येथे इयत्ता सातवी मध्ये शिकत असून त्याने १४ व्या अखिल भारतीय रूट्स – २ आंतरशालेय स्पर्धेत शास्त्रीय हार्मोनियम श्रेणीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अखिल भारतीय रूट्स 2 रूट्स आंतर-शालेय स्पर्धेत अनेक शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संकेतला यासाठी अखिल भारतीय शास्त्रीय हार्मोनियम श्रेणीतील प्रथम पारितोषिक विजेते पद, नोकिया स्मार्टफोनसह विजेते प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
              त्याच्या या यशाबद्दल नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या मीना मनी, उप प्राचार्य मनोज वानखेडे, संगीत शिक्षक उमाकांत पिंपरीकर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, राजुरा येथील परिचत शिक्षक, नातेवाईक, मित्रमंडळी आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS