मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांकरिता  लाडला पत्रकार योजना सुरू करावी – संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस

HomeNewsनागपुर डिवीजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांकरिता  लाडला पत्रकार योजना सुरू करावी – संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस

गौतम नगरी चौफेर (शिला धोटे) – भंडारा -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांकरता महिलांकरता  बऱ्याच योजना ची घोषणा केलेली आहे व त्या घोषणा प्रत्यक्षात अमलात येताना सुद्धा दिसत आहे. परंतु जो पत्रकार ऊन ,वारा ,पाऊस याचा विचार न करता सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देतो. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजना आपला पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा काम करतो त्या पत्रकारांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्लक्ष कसे काय करतात? आज बरेच पत्रकार आहेत की त्यांची परिस्थिती आज हालाखीची आहे. त्यांना कोणत्याच प्रकारचे मानधन मिळत नाही. त्यांना जाहिरात सुद्धा दिल्या जात नाही. अशा परिस्थितीत त्या पत्रकारांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह कसा करावा असा एक प्रश्न निर्माण होतो ? लोकशाहीचा  चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची स्थिती अशी असेल तर पत्रकारांनी काय करावं ?फक्त राजकारणी लोकांच्या बातम्या देऊन त्यांना प्रकाश झोतात आणून त्यांना प्रसिद्धी द्यायची व मोठमोठे पदावर नेऊन त्यांना पोहोचवायचे मात्र या पत्रकारांकडे दुर्लक्ष केल्या जातो त्यापेक्षा शोकांतिका काय असू शकते! त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पत्रकारांच्या बाबतीत सकारात्मक विचार करून त्यांना लाडला पत्रकार योजना सुरू करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page