गौतम नगरी चौफेर (राजुरा 17 सप्टेंबर) – बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. तर आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा झाला. विध्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. देशभक्तिपर नृत्य सादर करून विध्यार्थीनीनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मनोहरराव साबणानी, संचालक मधुकरराव जाणवे, अल्का सदावर्ते, पालक प्रतिनिधी किशोर चांदेकर, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट मास्तर बादल बेले आदींची उपस्थिती होती. यावेळी राजुरा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेतुन जिल्हा स्तरावर निवड झालेल्या कुस्ती खेळातील संकेत मोहितकर, मानव मोहितकर, अमोघ पहाणपटे, सुरज सोलंनकर, थाळीफेक स्पर्धेतील क्षितिज वडस्कर, भालाफेक मधील रवी तांडी आणि कबड्डी खेळातील चौदा व सतरा वर्ष वयोगटातील मुलींचे दोन्ही संघ, यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पदक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री धोटे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी तर आभार सुनीता कोरडे यांनी मानले.
COMMENTS